जुन्या टिव्हीला अशाप्रकारे बनवा स्मार्ट टिव्ही


स्मार्ट टिव्हीचा ट्रेंड सध्या जोरात आहे. अनेक लोकांच्या घरात स्मार्ट टिव्ही पाहायला मिळत असतो. मात्र अनेक लोक महाग असल्याने स्मार्ट टिव्ही घेऊ शकत नाही.  अनेकांकडे एलईडी टिव्ही देखील असताता, मात्र ते स्मार्ट नाहीत. जेणेकरून त्यात अ‍ॅप डाऊनलोडकरून टिव्ही शो अथवा वेब सिरीज बघता येत नाही. जर तुमच्या घरात देखील जुना टिव्ही आहे व तुम्हाला वेब सिरिज अथवा शो बघता येत नसेल, तर आम्ही तुमच्यासाठी अशीच एक टेक्निक घेऊन आलो आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या जुन्या टिव्हीला स्मार्ट टिव्हीमध्ये बदलू शकता. चला तर जाणून घेऊया.

यासाठी तुमच्या जुन्या टिव्हीमध्ये एचडीएमआय पोर्ट आणि युएसबी पोर्ट असणे गरजेचे आहे. जर या दोन गोष्टी तुमच्या टिव्हीमध्ये असतील तर तुम्ही टिव्हीला स्मार्ट बनवू शकता.

क्रोमकास्ट 3 द्वारे जुना टिव्ही बनणार स्मार्ट टिव्ही –
गुगल क्रोमकास्ट 3 एक असे डिव्हाईस आहे, जे 800 पेक्षा अधिक अप्स सपोर्ट करते. यामध्ये नेटफ्लिक्स, हॉटस्टार सारखे लोकप्रिय अ‍ॅपचा समावेश आहे. तुम्ही या डिव्हाईसला 3,499 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. हे डिवाईस तुम्हाला फुल एचडी + टिव्ही पाहण्याचा अनुभव देखील देईल. तुम्ही गुगल क्रोमकास्टला, आयफोन, आयपँड, अँड्राईड फोन, लॅपटॉप तसेच गुगल असिस्टेंटच्या वॉईस कमांडद्वारे देखील चालवू शकता.

कसे कनेक्ट कराल क्रोमकास्ट 3 ?
सर्वात आधी क्रोमकास्टला टिव्हीमध्ये देण्यात आलेल्या एचडीएमआय पोर्टमध्ये लावा आणि पावर सोर्सद्वारे कनेक्ट करा. त्यानंतर वायफायद्वारे मोबाईल, लँपटॉप अथवा टॅबलेटशी जोडा. आता ज्या डिव्हाईसद्वारे तुम्ही क्रोमकास्टला कनेक्ट केल आहे. त्यावर गुगल होम हे अ‍ॅप डाऊनलोड करा. क्रोमकास्ट सेटअप झाल्यानंतर तुम्ही मोबाईल, लॅपटॉप अथवा टॅबलेटमधील कोणतीही गोष्ट टिव्हीवर पाहू शकता.

Leave a Comment