हिरोशिमा : लाखो लोकांचे प्राण घेणाऱ्या त्या हल्ल्याला झाली 74 वर्ष


जापानचे शहर हिरोशिमावर अमेरिकेने अणुबाँम्ब टाकलेल्या घटनेला 74 वर्ष पुर्ण झाली असून, यानिमित्ताने सकाळी एक घंटी वाजवून या दिवसाची आठवण करून देण्यात आली. शहराच्या महापौरांनी सांगितले की, जगभरात वाढणारा राष्ट्रवाद शांततेसाठी धोकादायक आहे. हिरोशिमाच्या पीस मेमोरियल पार्कवरील आकाश आजही तसेच स्वच्छ होते, जसे 6 ऑगस्ट 1945 ला होते. याच दिवशी अमेरिकेच्या बी-29 ने शहरातील सैन्यांना लक्ष करत अणुबाँम्ब टाकला होता. या हल्ल्यात  दीड लाख लोक मारली गेली होती.

वार्षिक समारोहासाठी झिरो पार्कजवळील कार्यक्रमात संबोधन करताना महापौर कजुमी मात्सुई यांनी आव्हान केले की, जग हे अणुबाँम्ब विरहित असावे व राष्ट्रवादाचा धोका असल्याचे देखील त्यांनी सांगितले. कोणत्याही राष्ट्राचे नाव न घेता ते म्हणाले की, काही देश राष्ट्रवादाला बढावा देत असून, परमाणूंचे देखील आधुनिकीकरण आहेत.

ते म्हणाले की, काही देश तीच परिस्थिती पुन्हा निर्माण करत आहेत जी, शीतयुध्दानंतर समाप्त झाली होती. पंतप्रधान शिंजो अबे म्हणाले की, जापानचे उत्तरदायित्व हे अणु संपन्न आणि अणू विरहित राष्ट्रांच्यामधील अंतर कमी करणे हे आहे.

जापानच्या सरकारने अणू चाचण्यांवर प्रतिबंधांसंबंधी संयुक्त राष्ट्राच्या करारामध्ये सहभाग घेतला नव्हता. द्वितीय विश्वयुध्दाच्या शेवटी अमेरिकेने जापानवर दोन अणुबाँम्ब हल्ले केले होते. पहिला हल्ला 6 ऑगस्टला हिरोशिमावर तर दुसरा हल्ला  9 ऑगस्ट रोजी नागासाकीवर करण्यात आला होता. या हल्ल्यात हिरोशिमामध्ये दीड लाख तर नागासाकीच्या हल्ल्यात 74 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment