फ्लिपकार्ट लवकरच लाँच करणार मोफत व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवा


वॉलमार्टचा मालकी हक्क असलेली कंपनी फ्लिपकार्ट अँमेझॉनला टक्कर देण्यासाठी लवकरच मोफत व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवा सुरू करणार आहे. कंपनीने सोमवारी घोषणा केली की, या प्लॅटफॉर्मवर अनेक भाषांमधील व्हिडीओ उपलब्ध असतील.

फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमृती यांनी सांगितले की, फ्लिपकार्ट व्हिडीओज नावाने सुरू होणाऱ्या या प्लॅटफॉर्मवर शॉर्ट फिल्म आणि फिल्मबरोबरच अनेक भाषांमधील वेब सिरीज देखील असतील. चांगल्या कंटेटसाठी कंपनी विशेष लक्ष देत आहे. कंपनी 20 करोड भारतीयांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. कंपनीची रणनीती ही शॉपिंग वाढवण्याबरोबरच वापरकर्त्याला या प्लेटफॉर्मवर आणून, त्याला जास्तीत वेळ घालवायला लावणे ही आहे.  अँमेझॉनची देखील अँमेझॉन नावाने व्हिडीओ आणि म्युझिक स्ट्रिमिंग सुविधा आहे. त्याचे शुल्क महिन्याला 129 रूपये तर वर्षाला 999 रूपये आहे.

रेल्वे स्टेशनमध्ये देखील फ्री सेवा –
भारतीय रेल्वे देखील प्रवाशांना लवकरच मोफत व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवा देणार आहे. रेल्वेच्या या सेवेमुळे नागरिकांना रेल्वेत प्रवास करताना आणि रेल्वे स्टेशनवर मोफतमध्ये चित्रपट, सिरीज, बातम्या बघता येणार आहे.

भारतीय रेल्वेने या सेवेसाठी रेलटेलबरोबर भागीदारी केली आहे. ही तीच कंपनी आहे जी आधी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना मोफत वायफाय सुविधा पुरवते. या सेवेमध्ये ग्राहकांना हिंदीबरोबरच अनेक भाषेत व्हिडीओ पाहता येणार आहेत.

वैशिष्ट म्हणजे प्रवाशांकडून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून, रेल्वेमध्ये देखील या सेवेचा लाभ घेतला जाणार आहे. रेल्वेचा या सेवेची माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत दिली.

बफर फ्री सर्विस देण्यासाठी रेल्वेमध्ये वेगवेगळे सर्वर लावले जाणार आहेत. मात्र व्हिडीओ कंटेटसाठी कोणत्या कंपनीबरोबर भागीदारी झाली आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

Leave a Comment