विंटेज फिल्म पोस्टर्सचा लंडनमध्ये लिलाव


लंडन येथे प्रसिद्ध सोथबे ऑक्शन हाउसतर्फे विंटेज फिल्म पोस्टर्सचा लिलाव केला जाणार आहे. हा लिलाव २३ ऑगस्टपासून सुरु होऊन २ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. त्यात १९३३ सालच्या किंगकॉंग चित्रपटाच्या फ्रेंच पोस्टरसह १९० पेक्षा अधिक आर्टपीस मांडले जाणार आहेत. किंगकॉंगच्या पोस्टरला या लिलावात ६० हजार डॉलर्सची किंमत मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या लिलावात ३०च्या दशकातील ६० यशस्वी चित्रपटांची पोस्टर, आर्टवर्क ठेवली जाणार असून त्यात लाईट ऑफ न्यूयॉर्क, गिल्डा अँड द बर्डस, वॉल्ट डिस्नेची दुर्मिळ आर्टवर्क असतील. सोथबे फिल्म पोस्टर कन्सल्टंट ब्रूस मार्शट यांनी असा दावा केला कि, फिल्म जेवढी प्रसिद्ध तेवढे तेवढे पोस्टरचे मूल्य अधिक असते. या प्रदर्शनात अमेरिका, फ्रांस, इटली, इंग्लिश, जपानी संग्राहक तसेच भारतातील काही पीस सामील असतील. या लिलावात माल्टेज फाल्कन पोस्टरला ३० हजार डॉलर्सची किंमत मिळेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment