गरमागरम कुकीजचा अंतराळात आस्वाद घेणार अंतराळवीर


आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये काही दिवसांचा मुक्काम ठोकणारे अंतराळवीर आता अंतराळात ताज्या गरमागरम कुकीज, बिस्किटे, रोल, पॅटीस व अन्य खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकणार आहेत. यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने खास ओव्हन तयार केला आहे. यामुळे शून्य गुरुत्वाकर्षण असलेल्या ठिकाणी बिस्किटे कशी बनतात हेही तपासता येणार आहे.

माजी अंतराळवीर माईक मेसिमिनो या संदर्भात माहिती देताना म्हणाले, हा खास ओव्हन झिरो जी किचेन व डबल ट्री बॉय हिल्टन कंपनीने संयुक्तरित्या तयार केला आहे. लाटण्याच्या आकाराचा एक खास कंटेनर त्यात असून त्याची मदत मायक्रोग्रॅव्हीटी मध्ये खाद्य पदार्थ भाजण्यासाठी होणार आहे. या स्टेशन मध्ये पृथ्वीसारखे कृत्रिम वातावरण तयार केले गेले आहे. आजपर्यंत येथे राहणारे अंतराळवीर सुके पदार्थ किंवा तयार अन्न बरोबर आणत असत. अंतराळमोहिमांच्या इतिहासात प्रथमच स्पेस स्टेशन मध्ये अंतराळवीर बिस्किटे, कुकीज बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकणार आहेत. नोव्हेंबर २०१९ मध्ये हा खास ओव्हन लाँच केला जाणार आहे असे समजते.

Leave a Comment