पत्नीकडून घेतले २०००० उधार घेऊन खरेदी केली लॉटरी, एका रात्रीतुन कमविले २८ कोटी


कधी कोणाचे नशीब कसे बदलेल सांगता येत नाही. असेच काहीसे विलास रायक्ला नावाच्या भारतीय शेतकऱ्याबरोबर झाले आहे. एकेकाळी नोकरी शोधण्यासाठी फिरायला लागलेला हा व्यक्ती एकाच दिवसात करोडपती झाला आहे.

विलास रायक्ला नावाचा  शेतकरी दुबईमध्ये नोकरी शोधण्यासाठी गेला होता. मात्र अनेक प्रयत्न केल्यानंतर देखील त्याला नोकरी काही मिळाली नाही. नोकरी न मिळाल्यामुळे विलास पुन्हा भारतात आला. मात्र भारतात येताच त्याचे नशीब पुर्णपणे बदलून गेले. भारतात येताच त्याला लॉटरी लागल्याने, एका रात्रीत तो करोडपती झाला आहे. विलासला 4 मिलियन डॉलर्सची लॉटरी लागली आहे.

हैद्राबादमध्ये राहणारा विलास रायक्ला लॉटरी Dh15 रफल लॉटरीचा विजेता झाला आहे. नोकरी न मिळाल्याने त्याने 45 दिवसांआधीच दुबई सोडली होती. शनिवारी त्याला लॉटरी लागल्याची माहिती देण्यात आली.

विलास रायक्ला आणि त्याची पत्नी हैद्राबादमध्ये शेती करतात. शेतीद्वारे होणारी त्यांची वार्षिक कमाई 3 लाख रूपये आहे. तसेच त्याला दोन मुली देखील आहेत.

विलास आधी दुबईमध्ये राहत असे. तेथे तो ड्रायवर म्हणून काम करत असे.  तो दोन वर्षांपासून दुबईमध्ये रफल तिकीट खरेदी करत होता. अखेर त्याच्या नशीबाने त्याला साथ दिली.

लॉटरी जिंकल्यानंतर विलास म्हणाला की, या आनंदानेच कारण पत्नी पद्मा असून, तिच्यामुळेच हे संभव झाले आहे. नोकरी न मिळाल्यावर त्याने पत्नीकडून 20 हजार रूपये घेऊन मित्राला तिकीट खरेदी करण्यास सांगितले होते. मित्राने विलासच्या नावाने तीन तिकीटे खरेदी केली होती व एकामध्ये त्याला लॉटरी लागली.

Leave a Comment