आशियातील सर्वात श्रीमंत गाव, प्रत्येक कुटूंबाचे उत्पन्न आहे 70 लाख रूपये


शिमलापासून 92 किलोमीटर दूर 7774 फूट उंचावर असलेल्या मडावग गावांमध्ये  कोणी उद्योगपती नाही की, कोणी कोणत्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करते. तरी देखील हे गाव आशियामधील सर्वात श्रींमत गाव आहे. येथील प्रत्येक कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 70 ते 75 लाख रूपये आहे. याचे कारण सफरचंदाच्या बागेमध्ये त्यांनी घेतलेले कष्ट आहेत.

सध्या गावामध्ये सफरचंद येण्यास सुरूवात झाली आहे. 1800 लोकसंख्या असलेल्या गावकऱ्यांना आशा आहे की, यावर्षी 7 लाख पेटी सफरचंद निघतील. या गावातील सफरचंद देशातील सर्वात चांगल्या दर्जाचे सफरचंद आहेत. रॉयल सफरचंद, रेड गोल्ड, गेल गाला सारखे सफरचंद शेतकऱ्यांनी लावली आहेत. गावामध्ये 1980 पर्यंत सफरचंद नव्हते. 1990 मध्ये किसान हिरा सिंह डोगाराने पहिल्यांदा सफरचंदाचे झाड लावले. त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्यावर संपुर्ण गाव सफरचंद लावू लागले. हिरा सिंह सांगतात की, आज गावातून दरवर्षी 23 ते 15 लाख सफरचंदाचे बॉक्स जगभरात जातात.

यागावातील सफरचंदाचा आकार खूप मोठा आहे. बर्फ पडत असल्याने सफरचंदाचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे सफरचंद लवकर खराब देखील होत नाही. येथील शेतकरी बागेंची देखभाल बाळांप्रमाणे करतात. थंडीमध्ये बागेतच राहतात. शून्य डिग्री तापमान असताना देखील, झाडांवरून बर्फ बाजूला काढतात. बर्फ झाडांच्या फांद्या तोडू शकतो. एप्रिल ते ऑगस्ट  – सप्टेंबरपर्यंत पीक तयार होते. या दरम्यान जर गारा पडल्यातर पुर्ण पीक वाया जाते. गारांपासून पीक वाचवण्यासाठी त्यावर जाळी लावण्यात आली आहे.

Leave a Comment