जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम ३७० हटवण्याची शिफारस


नवी दिल्ली – सोमवारी राज्यसभेत काश्मीरमधील सध्याच्या तणावपूर्ण विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन केले. जम्मू-काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटवण्याची शिफारस त्यांनी मांडली. ही शिफारस अमित शहा यांनी मांडताच संसदेत मोठया प्रमाणावर गदारोळ झाला.

आम्ही काश्मीरच्या विषयावर चार विधेयके मांडणार आहोत. प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास आणि प्रत्येक प्रश्नावर उत्तर देण्यास आम्ही तयार असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. काश्मीरमध्ये लागू असलेले घटनेचे कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव अमित शहा यांनी मांडल्यानंतर राज्यसभेत एकच गदारोळ सुरु झाला. कलम ३५ अ मध्ये बदल करण्याच्या पर्यायांवर केंद्र सरकार विचार करत असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून मोठया प्रमाणावर सैन्यबळ वाढवण्यात आले आहे. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला या दोघांनाही सोमवारी मध्यरात्री नजरकैद करण्यात आले.

Leave a Comment