बस बनली कॉम्प्यूटर लँब, 100 शाळेतील 6000 विद्यार्थी घेणार शिक्षण


राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील एक कॉम्प्युटर लँब असलेली बस बनवण्यात आली आहे. याद्वारे 100 सरकारी शाळांमधील 6000 विद्यार्थ्यांनी कॉम्प्यूटर, गणित आणि इंग्रजी शिकवले जाऊ शकते. सुरजमल तापाडिया मेमोरियल ट्रस्ट आणि सुप्रीम फाउंडेशनने एक कॉम्प्यूटर लँब मोबाईल सेवा सुरू केली आहे. यामध्ये कॉम्प्युटर आणि आधुनिक उपकरण लावण्यात आलेले आहेत.

सुरजमल तापाडिया संस्कृत महाविद्यालयाचे सचिव जुगल किशोर बियानी यांनी सांगितले की, बस त्या सरकारी शाळेत जाईल, जेथे 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, विज्ञान आणि कॉम्प्यूटर सारख्या विषयांसाठी लँब नाही. दावा करण्यात येत आहे की, ही राजस्थानची पहिली आधुनिक लँब बस आहे.

लाडनू भागामध्ये 192 शाळा आहेत. 100 शाळांमध्ये कॉम्प्यूटर लँब आणि  अन्य सुविधा नाहीत. अशावेळी ही बस दरदिवशी तीन शाळांमध्ये जाईल. संस्कृत महाविद्यालयाचे सचिव जुगल किशोर यांनी सांगितले की, जर हा प्रयोग यशस्वी झाला तर बसच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येईल.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेंमत कृष्ण मिश्रांनी सांगितले की, आधुनिक सुविधा असलेली बस बनवण्यासाठी 45 लाख रूपये लागले. बसमध्ये एसी आणि 21 कॉम्प्यूटर आहेत. याद्वारे एकाच वेळी 21 विद्यार्थ्यांना शिकवले जाऊ शकते. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रत्येक विषयासाठी तीन शिक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे.

Leave a Comment