इम्रान खान यांनी न्यूज अँकरविरोधात ठोकला 1 हजार कोटींचा मानहानीचा दावा


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका टिव्ही चॅनेलचे अँकर नजम सेठीला त्यांच्या खाजगी जीवनासंबंधी खोट्या गोष्टी दाखवल्याचा आरोप करत 1 हजार करोड रूपयांची मानहानीची नोटीस बजावली आहे.

इम्रान खान यांचे सल्लागार बाबर अनवर म्हणाले की, टिव्ही चॅनेल पत्रकार नजम सेठीने पंतप्रधानांच्या जीवनातील खाजगी गोष्टी दाखवत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांना 1 हजार करोड रूपयांची मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे.

नोटीसचे फोटो आणि त्याची माहिती ट्विटरवर पोस्ट करत पाकिस्तानमधील तहरीक-ए-इंसाफ पार्टीचे जनसंपर्क प्रमुख अजघर लहारी म्हणाले की, पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे की, पंतप्रधानांविषयी खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कोणतीही दया केली जाणार नाही.

ते म्हणाले की, इम्रान खान यांच्या खाजगी जीवनाबद्दल नजम सेठीने अनेक लाजिरवाणे दावे केले आहेत. तिने एका खाजगी चॅनेलमध्ये बसून कायदा आणि नैतिकतेचे उल्लंघन केले आहे. पंतप्रधानांची प्रतिष्ठा धूळीस मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ते म्हणाले की, त्यांना आशा आहे की, सेठी घाबरून जाण्यापेक्षा न्यायालयाचा सामना करतील.

तसेच, पाकिस्तानने युरोपियन युनियन बरोबर पाच वर्षांचा केले असून, यामध्ये गरीबी कमी करणे, सुशासन इत्यादी गोष्टींचा समावेश असून, यासाठी 13 मिलियन युरोंचा खर्च येणार आहे.

Leave a Comment