ह्युएई लवकरच लाँच करणार स्वतःची ऑपरेटिंग सिस्टिम असलेला स्मार्टफोन


चीनी स्मार्टफोन कंपनी ह्युएई एका नवीन स्मार्टफोनचे परीक्षण करत असून, या फोनमध्ये कंपनीची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टिम होंगमेंग असणार आहे. यावर्षाच्या अखेरपर्यंत या फोनची विक्री सुरू होण्याची शक्यता आहे. होंगमेंग ऑपरेटिंग सिस्टम आणणे हा ह्युएईचा मोठा निर्णय समजला जात आहे.

या नवीन ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या फोनची किंमत 2000 युआन म्हणजेच 20 हजार रूपये असण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, होंगमेंग ओएसला कंपनीतर्फे 9 ऑगस्टला दक्षिण चीनमध्ये आयोजित डेव्हलपर कॉन्फ्रंसमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. चीनमध्ये ह्युएई स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री होते.

याआधी ह्युएईने सांगितले होते की, होंगमेंग ही ऑपरेटिंग सिस्टम इंटरनेटशी संबंधीत प्रोडक्टसाठी असणार आहे. मागील महिन्यात कंपनीने सांगितले होते की, या ऑपरेटिंग सिस्टमचा पहिला डिवाईस कंपनीचा हॉनर ब्रँड स्मार्ट टिव्ही असणार आहे.

मागील आठवड्यात झालेल्या कार्यक्रमात कंपनीचे चेअरमन लिआन्ग हुआ म्हणाले होते की, गुगल अँड्राईड सिस्टम कंपनीच्या फोनसाठी चांगली आहे. मात्र होंगमेंग सिस्टम कंपनीची पुढील काळासाठी रणनीती असणार आहे.

कंपनीचे 2019 च्या पहिल्या सहा महिन्यातील उत्पन्नामध्ये 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचे कारण त्यांच्या फोनची वाढलेली मागणी हे आहे. तसेच कंपनी अमेरिका आणि चीन या दोन्ही देशातील मुख्य केंद्रबिंदू देखील आहे.

Leave a Comment