सैनीच्या पदार्पणावरुन दोन माजी क्रिकेटपटूंमध्ये जुंपली


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात जलद गोलंदाज नवदीप सैनीने 17 धावांमध्ये 3 बळी घेत शानदार प्रदर्शन केले. नवदीप सैनीच्या शानदार प्रदर्शननंतर भारताचा माजी सलामीवीर क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि बिशनसिंह बेदी यांच्यामध्ये विवाद झाल्याचे पाहायला मिळाली.

नवदीप सैनीच्या शानदार प्रदर्शननंतर गंभीरने ट्विट केले की, ‘नवदीप सैनीने भारताकडून पदार्पण करताना शानदार प्रदर्शन केले आहे. गोलंदाजी करण्याआधीच बिशन सिंह बेदी आणि चेतन चौहान यांना आउट करून तू दोन विकेट्स घेतले आहे.  एका अशा खेळाडूचे प्रदर्शन पाहणे, त्यांचा मिडील स्टंम्प उखडण्यासारखे आहे. त्यांनी मैदानवर उतरण्याआधीच त्याला बाहेर केले होते.’


गौतम गंभीरने ट्विट करत भारताचे माजी कर्णधार बिशन सिंह बेदीवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. गंभीरने ट्विट केले की, ‘बेदींनी त्यांचा मुलगा अंगदला तो अपात्र असताना देखील दिल्लीच्या संघात समावेश करण्यासाठी प्रयत्न केला. तसेच गंभीरने डीडीसीएचे सिलेक्शन कमेटी चीफ चेतन चौहान यांच्यावरही निशाणा साधला. तो म्हणाला की, ‘चौहान यांनी 2013 मध्ये नवदीप सैनीला दिल्लीच्या रणजी संघात येण्यापासून रोखले होते.’


बिशन सिंह बेदींना गंभीरचे या ट्विटबद्दल विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, ‘मला गौतम गंभीरप्रमाणे अशी खालच्या पातळीची गोष्ट करण्याची गरज नाही. मी ट्विटरवर त्यांनी केलेल्या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. मी सैनीबद्दल कधीही नकारात्मक बोललो नाही. त्याचबरोबर जर कोणी काही मिळवले असेल तर त्याच्या प्रतिभेच्या जोरावर मिळवले आहे, दुसऱ्यामुळे नाही.’

बेदी आणि चौहान हे डीडीसीएचे सदस्य असताना गौतम गंभीरने नवदीप सैनीला दिल्लीच्या रणजीत संघात घेण्याची विनंती केली होती. मात्र सैनी हरियाणामध्ये जन्मलेला असल्याने दिल्लीच्या संघात घेता येणार नाही, असे म्हणत नकार देण्यात आला होता.

गौतम गंभीर, बिशन सिंह बेदी आणि चेतन चौहान यांच्यामधील हा वाद आधीपासूनच आहे. मागील वर्षी अफगाणिस्तान विरूध्द झालेल्या कसोटी सामन्यात सैनीची निवड झाल्यावर देखील गंभीरने त्यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच, सैनीने अनेकवेळा आपण आज जे काही आहे ते गौतम गंभीर आणि दिल्लीच्या काही खेळाडूंमुळे असल्याचे अनेकवेळा म्हटले आहे.

Leave a Comment