सप्टेंबरमेध्ये येतोय आयफोन ११


अॅपल त्यांचा नवा स्मार्टफोन, आयफोन ११ पुढच्या म्हणजे सप्टेंबर महिन्यात लाँच करणार असल्याचे मिडिया रिपोर्ट सांगत आहेत. नव्या आयफोन बरोबरच कंपनी नवीन आयपॅड आणि नवीन मॅकबुक प्रो सुद्धा लाँच करत आहे असे समजते. नवीन आयपॅड १०.२ इंची स्क्रीनसह असेल तर मॅकबुकला १६ इंची स्क्रीन दिला जाणार आहे.

नवीन आयफोन ११ पेन्सिल सपोर्ट सह असेल असे या रिपोर्टमध्ये नमूद केले गेले असून तसे झाले तर पेन्सिल सपोर्टसह येणारा हा पहिलाच आयफोन असेल. या पेन्सिलच्या सहाय्याने युजर अनेक कामे सहज करू शकणार आहेत. आयफोनच्या टॉप व्हेरीयंट मध्ये १० एमपीचा सेल्फी कॅमेरा तर १४ एमपीचा रिअर कॅमेरा असेल असे संकेत दिले गेले आहेत.

नवीन आयपॅड डब्ल्यूडब्ल्यूडीसी २०१९ मध्ये सादर केले गेले होते. हे आयपॅड आयओएस १३ सह सह असेल असे समजते. यामुळे युजर होम स्क्रीन रीडिझाईन करू शकेल आणि त्यातून त्याला नवा इंटरफेस मिळेल तसेच एक पेज जादा अॅप्स दिसू शकतील. यात स्लीट व्हू नवीन अपडेट मिळणार आहे. त्यामुळे युजर एकाच वेळी अनेक फाईल्स किंवा डॉक्युमेंटवर काम करू शकणार आहेत. यात अनेक नवी फीचर्स दिली जात आहेत.

Leave a Comment