शाओमीचा नवा स्मार्टफोन सोलरवर होणार चार्ज


चीनी कंपनी शाओमी नवनवीन इनोव्हेटिव्ह उत्पादने बाजारात आणत आहे त्यात आता एका खास स्मार्टफोनची भर पडणार आहे. कंपनीने स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर सोलर पॅनल असलेल्या डिझाईनचे पेटंट घेतले असल्याचे सांगितले जात आहे. गतवर्षी शाओमी मोबाईल सोफ्टवेअरने जुलैमध्ये वर्ल्ड इंटेलेकच्युअल प्रॉपर्टी ऑफिसकडे या डिझाईनच्या पेटंट साठी अर्ज केला होता ज्यात सोलर सेल मोड्यूल पेटंट डिझाईन स्केचेस दिली गेली होती. हे डिझाईन लिक झाले आहे.

लिक झालेल्या डिझाईनवरून या फोनला नो नॉच डिस्प्ले असेल. त्यात इंदिस्प्ले कॅमेरा तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. बॅक साईडला ड्युअल कॅमेरा सेटअप असेल आणि दोन कॅमेऱ्यांच्या मध्ये एलइडी फ्लॅश दिला जाईल. फिंगरप्रिंट सेन्सर इनडिस्प्ले असेल. सोलर पॅनल या फोनचे युएसपी असू शकते असे संकेत दिले गेले आहेत. हे फोनचा मागचा बराच मोठा भाग कव्हर करेल. सोलर पॅनल अतिशय पातळ असतील. हा फोन सौर उर्जेवर चार्ज करता येणारा आहे.

Leave a Comment