काजोलच्या या सवयीने अजय हैराण


बॉलीवूडची चुलबुली हिरोईन काजोल काल म्हणजे ५ ऑगस्टला ४५ वर्षांची झाली. तिच्याविषयी कारण जोहर शो मध्ये बोलताना पती अजय देवगण याने एक तक्रार केली होती. त्याच्या म्हणण्यानुसार काजोल ऑनलाईन शॉपिंग सेल मध्ये खरेदी करत सुटते आणि त्याचा त्याला त्रास होतो. अजय म्हणतो, काजोल ब्रांडक्रेझी नाही. जी वस्तू तिच्यासाठी कम्फर्टेबल आहे आणि बजेट मध्ये आहे त्या वस्तू ती खरेदी करत सुटते.

काजोल फारशी सोशल नाही. बॉलीवूड मध्ये तिचे मोजके मित्र आहेत. फिल्मशिवाय अन्य सोशल कार्यात ती रमते. दोन मुलांची आई काजोल तिच्या मुलांविषयीच्या साऱ्या जबाबदाऱ्या उत्तम पार पडते. तिचा पहिला चित्रपट होता बेखुदी. तो फारसा गाजला नाही पण दुसरा बाजीगर खूप गाजला. गुप्तमध्ये तिने खलनायिका रंगविली आणि त्याबद्दल तिला फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाले होते. तीच्या दिलवाले दुल्हनियाने अभूतपूर्व यश मिळविले आहे. काजोल शिवभक्त आहे. ती ओम लिहिलेली हिऱ्याची अंगठी वापरते.

काजोलची मिनियेचर डॉल लंडनच्या नाईट्सब्रिजच्या हेरोडस मध्ये आहे. काजोलचा आवडता रंग आहे पांढरा आणि ती कविता करते. २०११ मध्ये तिला सन्माननीय पद्मश्री दिली गेली आहे.

Leave a Comment