फेक न्यूज रोखण्यासाठी व्हॉट्सअपचे खास फिचर लाँच


लोकप्रिय मॅसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने एक खास फिचर आणले आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवीन फिचर फेक न्यूज आणि अफवा रोखण्यासाठी आणण्यात आले आहे. हे फिचर अँड्राइड आणि आयफोन युजर्ससाठी आणण्यात आले आहे. हे फिचर Frequently Forwarded केल्या जाणाऱ्या मेसेजसाठी असणार आहेत. याद्वारे युजर्स मेसेज कितीवेळा फॉरवर्ड केला गेला आणि त्याची प्राव्हेसी काय आहे याबाबत माहिती मिळेल. पाच पेक्षा अधिक मेसेज फॉरवर्ड केल्यास लेबल दिसेल.

मेसेजवर दिसणार चिन्ह –
व्हॉट्सअपच्या लेटेस्ट वर्जनमध्ये हे फिचर देण्यात आले आहे. याआधी कंपनीने फॉरवर्ड मेसेजवर एक चिन्ह दाखवण्यास सुरूवात केली आहे. एक सिंगल ऐरो मेसेजवर दिसते. त्याचा अर्थ फॉरवर्डेट मेसेज होतो. आता नवीन येणाऱ्या वर्जनमध्ये लेबेल डबल ऐरोचे असणार आहे.

एकावेळी केवळ पाच जणांना मेसेज फॉरवर्ड –
व्हॉट्सअपने म्हटले आहे की, युजर्सची प्राव्हेसी कायम ठेवण्यासाठी फॉरवर्ड मेसेजला नियंत्रणात ठेवण्यात आले आहे. एकावेळी केवळ पाच जणांच मेसेज फॉरवर्ड केला जाऊ शकतो. एक मेसेज पाच पेक्षा अधिकवेळा फॉरवर्ड केल्या मेसेजवर डबल टिक दिसेल. मेसेज कितीवेळा फॉरवर्ड करण्यात आला हे एंड टू एंड इनक्र्पिटेड असेल. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होणाऱ्या फेक न्यूजवर लगाम बसेल.

Leave a Comment