एटीएमद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी करा या गोष्टी


तुम्हाला आतापर्यंत वाटत असेल की, एटीएमचा वापर केवळ पैसे काढण्यासाठी केला जातो. तर तुम्ही चुकीचे आहात. एटीएमद्वारे रेल्वेचे तिकीट बूक करण्यापासून ते वीजचे बील असे अनेक गोष्टी करता येतात. एटीएमद्वारे कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी बँकेने अनेक नियम बनवले आहेत. कडक नियम असले तरी देखील एटीएमद्वारे अनेकांची फसवणूक होत असते.

मशीन जवळ असू शकतो सिक्रेट कॅमेरा  –
तुमचा एटीएम क्रमांक जाणून घेण्यासाठी मशीनजवळ कॅमेरा लावलेला असू शकतो. ज्याद्वारे रेकॉर्डिंग केले जाऊ शकते. कार्डचा वापर करण्याआधी जाणून घ्या की, मशीनच्या वरती दुसरी कोणतीही वस्तू लावलेली नाही. जर तुम्हाला शंका आली तर तेथे असलेल्या कर्मचाऱ्याला त्याबद्दल माहिती द्या.

आजूबाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीपासून सावधान –
अनेकवेळा असे होते की, पैसे काढत असताना, आपल्या मागे कोणीतरी उभे असते. त्यामुळे अशावेळेस सावध राहवे. कारण ती व्यक्ती तुमचा पिन क्रमांक जाणून घेऊ शकते.

कार्ड क्लोनिंगद्वारे फसवणूक –
काहीजण कार्ड क्लोनिंगद्वारे तुमच्या एटीएमकार्डपर्यंत पोहचतात.  एटीएममशीनवर एक  स्कीमर नावाची मशीन लावलेली असते. ही मशीन केवळ सात हजार रूपयांमध्ये मिळते. यामशीनद्वारे कार्ड वापरल्यावर त्यामध्ये तुमची माहिती कॉपी केली जाते. यामध्ये तुमच्या बँकेची सर्व माहिती असते. त्यानंतर ही सर्व माहिती एक ब्लँक कार्डमध्ये ट्रांसफर केली जाते. याद्वारे दुसरे कार्ड बनवले जाते, ज्यावर तुमची माहिती असते व याद्वारेच ते पैसे काढतात.

कार्ड स्वाइप करताना घ्या काळजी –
सामान खरेदी करताना, मॉलमध्ये अथवा कोणत्याही अन्य जागेवर जर तुम्ही कार्डचा वापर करत असाल तरी देखील फसवणूक होऊ शकते. नेहमी कार्ड स्वाइप स्वतः करावे व पासवर्ड देखील स्वतःच टाकावा.

एटीएमकार्डचे अन्य फायदे –
इनकम टँक्स –
इनकम टँक्स भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. एटीएमद्वारे तुम्ही इनकम टँक्स भरू शकता. देशातील अनेक बँका ग्राहकांना ही सुविधा देतात. मात्र एटीएमद्वारे इनकम टँक्स भरण्याआधी तुम्हाला बँकेत याबाबत रजिस्टर करावे लागते. रजिस्टर केल्यानंतरच तुम्ही एटीएमद्वारे कर भरू शकता. तुमच्या खात्यातून पैसे कटल्यावर, तुम्हाला एक सीआयएन नंबर येतो. त्यानंतर 24 तासाने तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर जाऊन याच नंबरचा वापर करून प्रिंट देखील काढू शकता.

रेल्वे तिकीट करा बूक –
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक ही रेल्वे स्टेशनच्या इमारतीमध्ये असलेल्या एटीएमद्वारे ग्राहकांना तिकीट बूक करण्याची सुविधा देते. मात्र याद्वारे केवळ आरक्षित तिकीटच बूक करता येतात.

टेलीफोन आणि वीजेचे बिल भरा –
टेलीफोन आणि वीजेचे बिल देखील तुम्ही एटीएमद्वारे भरू शकता. मात्र बिल भरण्याआधी तुम्हाला एकवेळ सर्वात प्रथम बँकेच्या वेबसाईटवर रजिस्टर करावे लागते. याशिवाय तुम्ही गँसचे बिल देखील भरू शकता.

इंश्योरेंस पॉलिसीची हप्ता भरा –
एलआयसी, एचडीएफसी लाईफ आणि एसबीआय लाईफ सारख्या विमा कंपन्यांचे ग्राहक एटीएमद्वारे देखील विम्याचा हप्ता भरू शकतात. यासाठी तुमच्याकडे पॉलिसी नंबर असणे गरजेचे आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एटीएम मशीनच्या बिल पर्यायावर जाऊन तेथे विमा कंपनीचे नाव निवडावे लागेल. त्यानंतर पॉलिसी नंबर, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर टाकून तुम्ही हप्ता भरू शकता.

कर्जासाठी देखील निवेदन करू शकता –
एटीएम मशीनद्वारे तुम्ही कर्जासाठी देखील अर्ज करू शकता. कमी रक्कमेचे कर्ज असेल तर यासाठी बँकेत चक्करा मारण्याची गरज भासत नाही. देशातील अशा अनेक बँका आहेत ज्या एटीएमद्वारे ग्राहकांना कर्ज ऑफर करतात.

Leave a Comment