जाणून घ्या फ्रेंडशिप डेचा इतिहास काय आहे ?


फ्रेंडशिप डे 2019 लवकरच येणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यात येणार फ्रेंडशिप डे मित्रांसाठी खास असतो. मैत्री हे असे एक नाते असते, ज्यासाठी रक्ताच्या नातेच असावे याची गरज नसते. विचार करा, मित्रांशिवाय हे आयुष्य किती बोरिंग झाले असते. मित्रच नसते तर कोणाबरोबर आपण आपल्या गोष्टी शेअर केल्या असत्या, मस्ती केली असती ? मात्र तुम्हाला माहिती आहे का फ्रेंडशिप डे हा ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच का साजरा केला जातो ? चला तर मग फ्रेंडशिप डेचा इतिहास जाणून घेऊया.

मैत्रीचे प्रतिक म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या या दिवसाची सुरूवात 1930 मध्ये हॉलमार्क कार्डचे संस्थापक जोस हॉल यांच्यावतीने करण्यात आली होती.

1935 मध्ये पहिल्यांदा अमेरिकन कॉंंग्रेसने ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याची घोषणा केली होती. पहिल्यांदाच अमेरिकेने हा दिवस साजरा केला होता.

1997 मध्ये कार्टुन पात्र विन्नी द पूहला संयुक्त राष्ट्राने मैत्रीचा आंतरराष्ट्रीय दूत म्हणून निवडले. भारताबरोबरच जगातील अनेक देशांमध्ये फ्रेंडशिप डे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. मात्र दक्षिण अमेरिकी देशांमध्ये जुलै महिन्याला पवित्र समजले जाते. त्यामुळे तेथे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने देखील हा दिवस फ्रेंडशिप डे म्हणून घोषित केला आहे.

फ्रेंडशिप डेच्या दिवशी बँड बिटल्सने 1997 मध्ये एक गाणे रिलीज केले होते. With Little Help From My Friends… हे गाणे जगभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते.