लष्करातील जवानांसाठी विकी कौशलने लाटल्या चक्क चपात्या


अभिनेता विकी कौशल हा भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एरियल स्ट्राईकवर आधारित ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात. हाच विकी कौशल सध्या अरुणाचल प्रदेशमधील तवांगमध्ये लष्करासोबत वेळ घालवत आहे. त्याने गुरुवारी लष्कराच्या कॅम्पमध्ये जवानांसाठी चपात्यादेखील बनवल्या. आपल्या इंस्टाग्रामवर त्याने स्वतः याची माहिती दिली की, काही दिवस तो भारत-चीन सीमेवर तवांगमध्ये जवानांसोबत राहणार आहे.

असे देखील म्हटले जात आहे की, मेघना गुलजारच्या दिग्दर्शनात बनत असलेल्या 1971 वॉर हीरो फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये विकी मुख्य भूमिकेत झळकणार आहे आणि त्याला याचसाठी लष्करातील जवानांचे आयुष्य जवळून पाहायचे होते.


इंस्टाग्रामवर विकीने एक फोटो शेअर करून लिहिले, अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये भारत-चीन सीमेवर 14,000 फूट उंचीवर तैनात असलेल्या आपल्या भारतीय लष्करासोबत काही दिवस घालवण्याची संधी मिळाली.


विकी कौशल 1971 वॉर हीरो फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या बायोपिक व्यतिरिक्त स्वातंत्र्यता सेनानी उधम सिंह यांच्या बायोपिकमध्येही झळकणार आहे. शुजीत सरकार याचे दिग्दर्शन करत आहे. दोन्हीही चित्रपटांत देशाचा मन वाढवणाऱ्या भूमिकांमध्ये तो दिसणार आहे आणि यामुळे फील्डवर्क करून तो स्वतःला त्या पात्रांसाठी तयार करतो आहे.

Leave a Comment