वाहतुक कोंडीवर मुंबई महानगरपालिकेचा रामबाण उपाय


मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबईत वाहतुक कोंडी हा दररोजचा प्रश्न आहे. त्यातच मुंबईत गाड्या पार्क करण्याची सर्वात मोठी समस्या आहे. मुंबईत वाहतुक कोंडी ही सर्वसाधारणपणे पार्किंगमुळे होते अशी बोंबाबोब असते. मुंबई महानगरपालिकेने या अडचणीवर एक तोडगा काढला आहे. ही रोजची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बेस्टच्या 27 बस डेपोवर पे अँड पार्कची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.

काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर नुकतेच पाच हजार ते पंधरा हजारांपर्यंत दंड आकारले जात होते. मुंबईकरांचा यावर संमिश्रित प्रतिसाद होता, याचे अनेकांनी समर्थन केले तर अनेकांनी विरोध केला आहे. महानगरपालिकेकडून मुंबईमध्ये होणारी वाहतूककोंडी रोखण्यासाठी ज्यादा दंड आकारण्याचे सांगितले गेले होते. याच वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून आता बेस्ट पुढे सरसावले आहे. मुंबईतील बेस्टच्या तब्बल 27 बस डेपोच्या जागा खाजगी पार्किंगसाठी देण्यात येणार आहेत.

बेस्ट उपक्रमाला बसआगार आणि बसस्थानकांमध्ये खाजगी वाहनांचे पार्किंग ‘पे अँड पार्क’ योजनेअंतर्गत करण्याची सूचना मुंबई महानगरपालिकेने केली होती, तसेच पार्किंगचे दर कमी ठेवण्याचा सल्ला ‘मुंबई पार्किंग अथऑरिटीने’ दिला होता ज्यामुळे लोकांचा ‘पे अँड पार्क’ला चांगला प्रतिसाद मिळेल.

3000 पेक्षा जास्त बसेस बेस्टच्या ताफ्यात आहेत. ही पे अँड पार्क सुविधा त्यांच्या पार्किंग नंतर उर्वरित जागेवर असणार आहे. यामुळे बेस्टच्या बसेसला पार्किंगसाठी कुठलीही अडचण येणार नाही. पार्किंगची सुविधा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धोरणावर दिली जाणार आहे. पार्किंगचे नियोजन आणि देखरेख करण्याची जबाबदारी बेस्टने प्रत्येक डेपोला दिली आहे. या पार्किंग सुविधेमुळे मुंबईकरांचा वाहतुकीचा आणि पार्किंगचा प्रश्न सुटणार असून बेस्टच्या बसेस ज्या रस्त्यावर धावतात त्यांना सुद्धा वेग मिळेल आणि रस्त्यावरील होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात का होईना कमी होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment