सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मलायकाचा सुपर हॉट लूक


अर्जुन कपूरसह असलेल्या नात्यामुळे अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. नेटकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मलायकावर निशाणा साधून तिला ट्रोलदेखील केले होते. पण या गोष्टींचा मलायकाला फारसा फरक पडत नसल्याचे दिसत आहे. एक नवे फोटो शूट नुकतेच मलायकाने केले आहे आणि सोशल मीडियावर या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मलायकाने केलेल्या एका नव्या फोटो शूटचे फोटो शेअर केले आहेत. या संदर्भातील वृत्त ‘हिंदूस्तान टाईम्स’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार मालदीवच्या समुद्र किनारी मलायकाने हे फोटो शूट केले आहे. तसेच हे फोटो ‘Travel + Leisure India’ या मॅग्झीनसाठी शूट केल्याचे म्हटले जात आहे. मलायका या फोटोमध्ये अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. चाहत्यांच्या मनावर तिच्या या फोटोंनी जादू केली आहे. मलायका या फोटोमध्ये समुद्र किनारी बसलेली असून तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.


सध्या सोशल मीडियावर मलायकाचे हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. मलायकाचे मालदीवला सुट्ट्यांचा आनंद लुटतानाचे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच करण जोहरच्या पार्टीमुळे देखील मलायका चर्चेत आहे. करण जोहरने एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी शेअर केला होता.


मलायका, अर्जुन कपूर, दीपिका पादूकोण, शाहिद कपूर, समेत कई आणि इतर बॉलिवूड कलाकार या व्हिडीओमध्ये हजर असल्याचे दिसत होते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून सेलिब्रिटींनी या पार्टीमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचे मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केले होते.

Leave a Comment