आयुष शर्मासोबत स्क्रीन शेअर करणार कतरिनाची बहिण


आपल्या अभिनयाने आणि सौंदर्यांच्या जोरावर बॉलिवूडची चिकनी चमेली अर्थात कतरिना कैफने अनेकांची मने जिंकल्यानंतर त्यापाठोपाठ आता यापाठोपाठ कतरिना कैफची बहिणही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतीच इसाबेल कैफच्या पहिल्या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.


लव्हयात्री फेम आयुष शर्मासोबत आपल्या पहिल्या चित्रपटात इसाबेल स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे ‘क्वाथा’ असे शीर्षक असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण ललित बुतानी करणार आहे. तर या चित्रपटाची निर्मिती सुनिल जैन, ओमप्रकाश भट्ट, आदित्य जोशी, अलोक ठाकूर आणि सुजय शंकरवार हे करणार आहेत.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आयुष शर्मा आणि इसाबेलचा एक फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. या नव्या जोडीला स्क्रीनवर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. चित्रपटाबद्दलच्या इतर गोष्टी अद्याप गुलदस्त्यातच आहेत.

Leave a Comment