अपघातामुळे ६ दिवस कारमध्ये अडकल्यावर पावसाचे पाणी पिऊन जगली हि महिला


‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. अपघातानंतर सहा दिवस कारमध्ये अडकलेल्या महिलेने ही म्हण खरी केली आहे. बेल्जियममध्ये कोरिन बेस्टाइन या 45 वर्षीय महिलेच्या कारचा घनदाट जंगलात अपघात झाला. अपघातामुळे तिला गाडीतून बाहेरच पडता येत नसल्याने, तब्बल सहा दिवस ती गाडीतच फसलेली होती.

6 दिवस गाडीमध्येच अडकलेल्या कोरिनचे पावसाच्या पाण्याने प्राण वाचवले. सहा दिवस तिने पावसाचे पाणी पिऊन प्राण वाचवले. कोरिनने सांगितले की, या अपघातात तिच्या पाठीला गंभीर जखम झाली, त्यामुळे ती गाडीतून बाहेर पडू शकत नव्हती. ती पुर्णवेळ शुध्दीमध्ये होती. हाताला इजा झाल्याने ती पायाने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होती. तिला अनेकवेळा फोन आले, मात्र इजा झाल्याने तिला फोन देखील उचलता येत नव्हता. काही दिवसांपुर्वीच अपघात झालेल्या या भागातील तापमान 41 सेल्सियस पर्यंत पोहचले होते.

काहीवेळा नंतर तिचा फोनदेखील बंद पडला. तिच्या घरच्यांनी ती सापडत नसल्याची तक्रार देखील पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. अपघाताच्या काहीवेळ आधीच मोबाईलच्या सिग्नलची नोंद झाली होती.

खूप शोधल्यानंतर अखेर तिचा पत्ता लागला व तिला त्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हा अपघात 23 जुलैला झाला होता. कोरिनने सांगितले की, मला वाटत होते की, आता माझे प्राण नाही वाचणार आणि कुटूंबातील लोक मला शोधू देखील शकणार नाही. मात्र ती चमत्कारानेच वाचली व आता सर्व ठीक आहे.

Leave a Comment