टेंशन आणि एकटेपणा दूर करणार कृत्रिम ब्वॉयफ्रेंड


टोकियो – एका कृत्रिम ब्वॉयफ्रेंडची निर्मिती जपानची व्हिडिओ गेम कंपनी लेव्हल-5 ने ओतोमे युशासोबत मिळून केली आहे. या ब्वॉयफ्रेंडला मिठी मारुन आपले टेंशन मुली आणि महिला दूर करू शकतील. तसेच आपल्यासोबत याला रेस्तराँ, फिल्म थिएटर किंवी शॉपिंग सेंटर अशा ठिकाणी घेऊन जाऊ शकतात. या प्रोडक्ट नाव ‘ब्वॉयफ्रेंड हग स्पीकर्स’ असे आहे.

पांढऱ्या रंगाची उशी दोन मोठे हात असणाऱ्या प्रोडक्टसोबत लावण्यात आली आहे. कंपनीचा नवीन गेम ‘हिरो ऑफ मेडन्स’च्या मुख्य व्यक्तिरेखेचे स्केच यावर बनवण्यात आले आहे. महिलांना अधिक कंफर्टेबल वाटण्यासाठी दोन्ही हातांमध्ये ब्लूटुथ स्पीकर्स बसवले आहेत. ब्वॉयफ्रेंडला मिठी मारताच हे स्पीकर्स वाजतात.

या ब्वॉयफ्रेंड स्पीकरला प्राप्त करणे सोपी गोष्ट नाही. कारण फक्त असा एकच सेट ओतोमे युशाने तयार केला आहे. तो पण विक्रीसाठी नाही. पण याला एकदा नशीबवान विजेता प्राप्त करू शकतो. यासाठी ट्विटरवर एक स्पर्धा ओतोमे युशा कंपनीने सुरु केली आहे. 9 ऑगस्ट रोजी स्पर्धेच्या विजेत्याचे नावाची घोषणा करण्यात येणार आहे.

Leave a Comment