चीनने बनवली आवाजावर कंट्रोल होणारी सायकल


एक अशी सायकल चीनच्या शिंगुआ यूनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी तयार केली आहे, ज्यावर केवळ आवाजाने नियंत्रण मिळवता येईल. सायकलची गती आर्टिफिशिअल इंटेलिजंसने तयार केलेल्या या सायकलमध्ये लावलेल्या व्हॉइस असिस्टंट अॅलेक्साच्या मदतीने येईल, तसेच आवाज उडवीकडे किंवा डावीकडे नेण्यासाठीदेखील कामी येईल. रस्त्यात काही अडचण आल्यावर किंवा स्पीड वाढवल्यावर एआय सायकल अलर्ट करेल. तसेच स्वतःहून ही सायकल बॅलेंस करते.

या संदर्भात शोधकर्त्यांनी सांगितल्यानुसार, एआय चिप सायकलच्या मागील चाकात लावण्यात आली असून सायकल किती मजबूत आहे, याचा तपास गायरोस्कोपने केला आहे. यात रस्त्यात येणाऱ्या अडचणींना पाहण्यासाठी कॅमेरा लावण्यात आला आहे. याचा स्पीड मायक्रोफोनच्या साहाय्याने कंट्रोल करता येतो. या संदर्भात नेचर या जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, दूरच्या प्रवासासाठी ही सायकल चांगली आहे. समोर उभ्या असलेल्या नागरिकांना ओळखण्यास आणि एका सरळ रेशेत चालण्यास ही सायकल सक्षम आहे. तसेच ही सायकल रस्त्यात येणाऱ्या स्पीड ब्रेकरला आणि सिग्नलला ओळखते. त्यामुळे रायडरला पँडल मारण्याची गरज नाही.

Leave a Comment