हा अहवाल सांगतो, इंटरनेट कार्स मुळे हजारोंच्या जीवाला धोका


जगभरात अत्याधुनिक फीचर्सनी युक्त कार्स लोकप्रिय होऊ लागल्या असल्या तरी या कार्स हॅकर्स साठी अतिशय सोपे टार्गेट असल्याने त्यामुळे हजारो लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा अमेरिकेतील वॉच डॉग या कन्झ्युमर अॅडव्होकसी ग्रुपने दिला आहे. किल स्वीच वाय कनेक्टेड कार्स कॅन बी किलिंग मशीन्स अँड हौ टू टर्न देम ऑफ या शीर्षकाखाली हा नवा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे.

हा अहवाल तयार करण्यापूर्वी पाच महिने निरीक्षणे नोंदविली गेली होती. अहवाल म्हणतो, सध्या ज्या इंटरनेट कार्स बाजारात आहेत त्याच्यावर सायबर हल्ला होऊ शकतो. हे प्रमाण मोठे असू शकते आणि त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचू शकतो. या कार्सना सेफ्टी सिस्टीम आहे मात्र इंटरनेटला जोडताना पर्याप्त सुरक्षेची काळजी घेतली गेलेली नाही. सायबर हल्य्याच्या स्थितीत कारची सुरक्षा प्रणाली इंटरनेटपासून वेगळी करता येत नाही. त्यामुळे गर्दीच्या वेळेत समजा एकाच वेळी अनेक कार्सवर सायबर हल्ला झाला तर एकावेळी किमान ३ हजार लोकांच्या प्राणाला धोका निर्माण होऊ शकतो.

या कार्सचे नियंत्रण स्मार्टफोनने करता येते. त्यात इंजिन स्टार्ट करणे, एसी सुरु करणे, लोकेशन तपासणे अशी अनेक कामे करता येतात. तुम्ही तुमच्या फोनवरून ही कामे करता तेव्हा अन्य कुणी इंटरनेटच्या माध्यमातून ही कामे करू शकतो. विशेषतः हॅकर्स याचा उपयोग मोठे हल्ले करण्यसाठी करू शकतात. या अहवालात सुरक्षेशी संबंधित बाबी नेटशी जोडण्याची पद्धत धोकादायक असे असे मत नोंदविले गेले आहे.

Leave a Comment