हवेत लटकत केवळ 8 मिनिटात जाता येणार दुसऱ्या देशात


चीन आणि रशियामधील लोकांसाठी एक खास सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेनुसार, केवळ 8 मिनिटात लोक एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकणार आहेत. दोन्ही देशांमध्ये ही सेवा पुढील वर्षी 2020 पासून सुरू होणार आहे.

दोन्ही देशांमध्ये केबल कारची निर्मिती करण्यात आली आहे. ही केबल कार चीनचा पुर्वांत्तर भागातील हेइहे शहरातून रशियाच्या ब्लागोवेशचेंस्क शहरापर्यंत जाईल. या प्रवासादरम्यान लोक रशिया आणि चीनच्या सीमेवर असलेल्या आमून नदीचे सुंदर दृश्य देखील बघू शकणार आहेत.

केबल कार सेवा सुरू करण्याची ही दोन्ही देशांची पहिलीच वेळ आहे. केबल कारद्वारे हेइई शहरातून रशियाच्या ब्लागोवेशचेंस्क शहरात जाण्यासाठी केवळ साडेसात मिनिटाच लागतील. ज्यामध्ये स्टॉपचा देखील समावेश आहे. मात्र स्टॉप न घेता, न थांबता हा प्रवास केवळ साडे तीन मिनिटात पुर्ण केला जाऊ शकतो.

केबल कारचे वैशिष्ट म्हणजे यामध्ये चार कॅबिन असतील. ज्यामध्ये एकावेळी 60 प्रवाशी सामानसोबत घेऊन जाऊ शकतील. तसेच या केबल कारसाठी लोकांना जास्त वेळ प्रतिक्षा देखील करावी लागणार नाही. कारण ही केबल कार दर 15 मिनिटांनी उपलब्ध असेल. सांगण्यात येत आहे की, या केबल कारचा आनंद घेण्यासाठी केवळ चीन आणि रशियाच नाही तर बाहेरील देशांचे नागरिक देखील येतील.

रशियामध्ये या केबल कारची डिजाईन करण्याचे काम एम्सटर्डमच्या युएन स्टुडिओला देण्यात आले आहे. या योजनेमध्ये रशियाची स्ट्रेल्का केबी या कंसल्टिंग कंपनीचा देखील समावेश आहे. तसेच चीनमध्ये या केबल कारची निर्मिती कोण करेल, याची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.

Leave a Comment