मोरक्कोत 3000 हेक्टरमध्ये बनवण्यात आले जगातील सर्वात मोठे सोलर पार्क


मोरक्को येथे जगातील सर्वात मोठे सोलर पार्क बनवण्यात आले आहे. 3000 हेक्टरमध्ये बनवण्यात आलेल्या या सोलर पार्कद्वारे 580 मेगावॉट वीज निर्मिती होईल. त्याचबरोबर जमीनीतून 7 लाख 60 हजार टन कार्बनचे देखील उत्सर्जन होईल. या सोलर पार्कला नूर औरजाजेट नाव देण्यात आले आहे. सांगण्यात येत आहे की, या सोलर पार्कद्वारे चेक गणराज्यची राजधानी प्रागसाठी वीजेची निर्मिती करण्यात येणार आहे.

मोरक्को जगातील नवीन उर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जीसाठी अतिमहत्वाकांक्षी देशांपैकी एक आहे. 2020 पर्यंत मोरक्को एकूण उर्जेच्या 42 टक्के उर्जा ही रिन्युएबल स्रोतांद्वारे प्राप्त करणार आहे.

सोलर पार्कच्या मध्यभागी 243 उंच टॉवर बनवण्यात आलेला आहे. हा अफ्रिकेचा सर्वात उंच टॉवर आहे. येथे विरघळणाऱ्या मिठाद्वारे वीज निर्मिती केली जाते.

सामान्यता सोलर पार्कमध्ये उर्जेला सरळ ग्रिडमध्ये पाठवण्यात येत असते. मात्र याच्या उलट या पार्कमध्ये लावण्यात आलेल्या हजारो आरशांद्वारे संचित रेडिएशनला फ्लूड (तरळ) युक्त हीट ट्यूबमध्ये पाठवले जाईल. ज्याद्वारे पॉवर युनिट संचालित होईल. येथे तयार करण्यात येणाऱ्या वीजेचा  नंतर वापर केला जाईल. विशेषता रात्री, जेव्हा वीजेची सर्वाधिक आवश्यकता असते.

दिवसभरात आरशांच्या रेडिएशनद्वारे एक सिलेंडर मीठ विरघळवले जाईल. याद्वारे रात्री 3 तास वीज पुरवली जाईल. विश्व बँकेने या प्रोजेक्टसाठी 2456 करोड रूपयांचे कर्ज दिले आहे.

वर्ल्ड बँकेनुसार, मोरक्कोच्या एकूण ऊर्जेचा 97 टक्के हिस्सा हा तेल अर्थात जिवाश्म इंधनाद्वारे येतो. यावरील निर्भरता कमी करण्यासाठी देशाने रिन्यूएबल एनर्जीकडे पावले उचलली आहेत.

मोरक्कन एजेंसी फॉर सस्टेनेबल एनर्जीचे वरिष्ठ प्रोजेक्ट मॅनेजर यासीर बदीहने सांगितले की, 2010 पर्यंत देशात वीजेची मागणी दुप्पट झाली आहे. आम्ही 2030 पर्यंत संपुर्ण वीजेची निर्मिती ही इंधनाऐवजी रिन्युएबल एनर्जीद्वारे पुर्ण करणार आहोत.

Leave a Comment