पाकिस्तानच्या वहाब रियाजची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती


पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमिरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या काही दिवसानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज, वहाब रियाज याने देखील खेळाच्या लांबलचक स्वरूपातून निरोप घेतला आहे. पाकिस्तानच्या दुनिया न्यूजच्या वृत्तानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष एहसान मनी यांना 34 वर्षीय वहाब रिजायने आपला निर्णय सांगितला. कॅनडामधील टी-20 लीगमध्ये वहाब खेळात असल्याने पाकिस्तानात परतल्यानंतर तो याबाबतची औपचारिक घोषणा करेल असे देखील त्याच्याकडून मनी यांना सांगण्यात आले. वहाबने दहा वर्षाच्या कसोटी कारकीर्दीत पाकिस्तानसाठी 27 सामने खेळले. यात त्याने 83 विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमधून वहाब याची निवृत्ती ही पाकिस्तान क्रिकेट संघासाठी वाईट बातमी ठरू शकते. पाकिस्तानसाठी वहाबने अंतिम कसोटी सामना 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळाला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड विरुद्ध सामन्यासाठी त्याला संघात स्थान मिळाले नाही. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये दोनदा एका डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी बजावली आहे.

Leave a Comment