सेक्सी अवतारामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली मिनिषा लांबा


आपल्या इन्स्टाग्राम पेजवर बॉलिवुडपासून सध्यातरी दूर असलेली अभिनेत्री मिनिषा लांबा हिने पुन्हा एकदा आपला बोल्ड फोटो शेअर केला आहे. बॉलिवुडमधील अनेक चित्रपटांमध्ये मिनिषा लांबाने काम केले आहे. आपले हॉट, सेक्सी आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत ती नेहमीच चर्चेत असते.

View this post on Instagram

Caption this pls

A post shared by Minissha Lamba (@minissha_lamba) on


किडनॅप, जिला गाजियाबाद, वेलडन अब्बा’, ‘बचना ऐ हसीनों’ या सारख्या बहुचर्चित चित्रपटांमध्ये मिनिषा लांबा हिने केले आहे. चित्रपटातील तिचे काम तिच्या चाहत्यांच्या आजही स्मरणात आहे. तिचा अलिकडे आलेला ‘भूमि’ हा शेवटचा चित्रपट होता. ती एक पोकर प्लेयर असल्याचेही सांगितले जाते. प्राप्त माहितीनुसार, शेरवुड हायस्कुलमध्ये मिनीषा लांबा हिने शिक्षण घेतले आहे. पुढे तिने चेत्तीनाद विद्याश्रम चेन्नई येथे शिक्षण घेतले. 2004 मध्ये तिने इंग्रजी विषयात दिल्ली येथील मिरांडा हाऊस येथू पदवी संपन्न केली.


पत्रकारिता क्षेत्रात मिनिषा लांबा हिला करिअर करायचे होते. पण, आपले पदवीचे शिक्षण दिल्ली येथून पूर्ण करत असतानाच तिला एलजी, सोनी, कॅडबरी, हाजमोला, एअरटेल, सनसिल्क यांसारख्या मोठ्या ब्रँडच्या उत्पादनांची जाहिरात मॉडेल म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या जाहिरातींच्या माध्यमातून मिनिषा लांबा प्रकाशझोतात आली.

View this post on Instagram

All you need.. Is some sun.. And a smile

A post shared by Minissha Lamba (@minissha_lamba) on


बॉलीवुड चित्रपट दिग्दर्शक शूजित सरकार यांनी 2005 मध्ये मिनिषा हिला आपल्या चित्रपटासाठी निमंत्रित केले. शूजित सरकार यांच्या चित्रपटात काम केल्यानंतर तिने बॉलीवुडमध्ये बरेच चित्रपट केले. तिच्या अभिनयाचे चांगले कौतुकही झाले.

Leave a Comment