मेंदूद्वारे नियंत्रित केला जाऊ शकणार व्हिडीओ गेम


स्विर्झलँडच्या वैज्ञानिकांनी अशी टेक्नोलॉजी तयार केली आहे, ज्याच्या मदतीने मेंदूद्वारे अर्थात डोक्याने व्हिडीओ गेम नियंत्रित केली जाऊ शकते. ही टेक्नोलॉजी अशा पध्दतीने तयार करण्यात आली आहे की, कोणतीही व्यक्ती मोटर फंकश्नस, जसे की क्वाड्रिलेजियाद्वारे डोक्याचा वापर करून गेम खेळू शकतो.

या प्रोगामचे नाव ब्रेन ड्रायव्हर ठेवण्यात आले आहे. या टेक्नोलॉजीची चाचणी अनेक लोकांवर करण्यात आली. यामध्ये सॅम्युअल कुंज या व्यक्तीचा देखील समावेश आहे. सॅम्युअलचे शरीर एका अपघातानंतर पुर्णपणे पॅरिलाइज्ड झालेले आहे. कुंज कारची गेम डिजिटल फिक्चरद्वारे खेळत आहेत. ज्यामध्ये ते मेंदूद्वारे कारला ऑपरेट करत आहेत. मात्र त्यांनी सांगितले की, यासाठी खुप एकाग्रता करावी लागते.

त्यांनी सांगितले की, मला खुप एकाग्र व्हायचे आहे. माझी बोट आणि मेंदूमध्ये काहीही संबंध नाही. मी आताही माझी बोट मेंदूद्वारे हलवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये जशी खुप एकाग्रता करण्याची गरज असते, त्याचप्रमाणे या गेमला निंयत्रित करण्यासाठी एकाग्रता करावी लागते.

डॉक्टर रिया लेहनर यांनी सांगितले की, मेंदूतील संकेतांचा वापर करून या व्हिडीओ गेमला नियंत्रित केले जाऊ शकते. वापरणाऱ्यांच्या डोक्याला इलेक्ट्रोड जोडले जाईल आणि त्याच इलेक्ट्रोडला कॉम्प्युटरशी जोडले जाईल. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, एक व्यक्ती ज्याचे पुर्ण शरीर काम करत नाही आणि केवळ मेंदू कार्य करत आहे. अशी व्यक्ती देखील हा गेम खेळू शकते.

Leave a Comment