सोशल मीडियात व्हायरल झाले खासदार नुसरत जहाँच्या हनिमूनचे फोटो


राजकारणात प्रवेश केल्यानंतर बंगाली अभिनेत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ खूपच चर्चेत आहे. पण पहिल्याच दिवशी लोकसभेत तिला भांगात सिंदूर आणि मंगळसूत्र घालून आल्याने ट्रोल व्हावे लागले होते.


त्याचबरोबर तिच्या ड्रेसिंगवरही अनेकांनी टीका केली. ज्यानंतर त्यांना नुसरतनेही सडेतोड उत्तर देते त्यांची बोलती बंद केल्यानंतर नुसरत पुन्हा एकदा चर्चेत आली. नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो नुसरतने शेअर केले आहेत. ती ज्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिची चर्चा सुरू आहे.

View this post on Instagram

Sleepyhead mornings.. 💤

A post shared by Nusrat (@nusratchirps) on


नुसरत आणि निखिल आपल्या बीझी शेड्यूलमधून वेळ काढून लग्नानंतर जवळपास 2 महिन्यांनंतर हनिमूनसाठी गेली आहे. नुसरतने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याठिकाणचे फोटो शेअर केले आहेत. ती ज्यात वेस्टर्न आउटफिट्समध्ये दिसत असून नेहमीप्रमाणे ग्लॅमरस दिसत आहे.


आपल्या हनीमूनचे फोटो शेअर करताना नुसरतने लिहिले आहे कि, हे चांगले होईल की, तुमचे डोके ढगांमध्ये असेल आणि तुम्हाला माहीत असेल की तुम्ही कुठे आहात… स्वर्ग जागेत नाही तर तर सुंदर क्षण, त्या क्षणाला त्या ठिकाणी असलेल्या सौंदर्यात दडलेला असतो. नुसरत आणि निखिलचे हे फोटो पाहिल्यावर ते सध्या मालदीव्समध्ये असल्याचा अंदाज लावला जात आहे. मात्र आपण कुठे आहे त्या लोकेशन विषयी कोणतीही माहिती तिने दिलेली नाही.


19 जूनला कोलकाताचा प्रसिद्ध बिझनेसमन निखिल जैनशी नुसरत जहाँ विवाहबद्ध झाली. त्यांनी टर्की येथे मोजक्याच लोकांच्या उपस्थित लग्न केले. बराच काळ सोशल मीडियावर त्यांचे लग्न चर्चेत राहीले होते.

Leave a Comment