आता टिक-टॉक व्हिडीओमध्ये अ‍ॅड करता येणार GIF फाईल


सोशल मीडिया अ‍ॅप टिक-टॉक युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता टिक-टॉक युजर्स आपल्या पोस्टमध्ये जिफ (GIF) फाईल देखील जोडू शकणार आहे. कंपनीने जिफ्फी (GIPHY) या कंपनीशी भागीदारी केली आहे. नवीन अपडेटमध्ये टिक-टॉक मिम्स आता जिफ्फी स्टिकर स्वरूपात उपलब्ध असतील. टिक-टॉक आता जगाला आपली प्रतिभा दाखवण्याबरोबरच कमाईचे देखील एक साधन झाले आहे.

टिक-टॉक एक व्हिडीओ अ‍ॅप आहे, ज्यावर गाणे अथवा डायलॉगवर शॉर्ट व्हिडीओ बनवता येतात. जिफ स्टिकर वापरण्यासाठी अ‍ॅपवर बटन GIPHY दाबावे.

कंपनीने टिक-टॉकबरोबर dabbing @DreaKnowsBest आणि dancing@Gabe सारखे स्टिकर्स बनविण्याची भागिदारी केली आहे. टिक-टॉकवर #getGIPHY सर्च केल्याने देखील स्टिकर्स दिसतात.

टिक-टॉक अ‍ॅप आयओएस आणि अ‍ॅंड्रॉइडवर 1 बिलियन पेक्षा अधिकवेळा डाऊनलोड करण्यात आलेले आहे. हे अ‍ॅप आशियामध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. हे अ‍ॅप चीनी कंपनी बाईट डान्सद्वारे बनवण्यात आले आहे. मागील वर्षी फेसबूकने देखील LASSO नावाचा एक अ‍ॅप शॉर्ट व्हिडीओ अप लॉच केला होता.

टिक-टॉकमध्ये व्हिडीओ बनवताना तुम्हाला तुमचा आवाज वापरता येत नाही. तुम्हाला लिप-सिंक करावे लागते. तसेच यावर वेरिफाईड युजर्सची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वेरिफाई अकाउंटला ब्लू टिक नाहीतर ऑरेंज टिक मिळते. व त्यांच्या अकाउंटवर पॉप्युलर क्रिएटर असे देखील लिहिलेले असते.

Leave a Comment