घटस्फोटानंतर देखील बॉलीवूडच्या या कपल्सची मैत्री कायम


बॉलीवूडमध्ये नाते तुटणे हे सध्या एकप्रकारे साधी गोष्ट झाली आहे. मात्र बॉलीवूडमधील काही कपल्स असे आहेत, जे घटस्फोटानंतर देखील एकमेकांबरोबर मैत्री टिकवून आहेत. या कपल्सनी घटस्फोट तर घेतला आहे, मात्र त्यांची मैत्री कायम आहे. एवढेच नाही तर या जोड्या एक दुसऱ्याच्या आनंदात देखील सहभागी होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच बॉलीवूडच्या 8 कपल्सबद्दल सांगणार आहोत, जे घटस्फोटानंतर देखील एकमेकांचे मित्र आहेत.

फरहान अख्तर आणि अधुना भबानी

24 एप्रिल 2017 ला फरहान अख्तर आणि अधुना भबानी यांनी घटस्फोट जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. दोघांच्याही लग्नाला 16 वर्ष झाली होती. अधुनाला अभिनेता डिनो मोरियाचा भाऊ निकोल मोरियाच्या रूपात पुन्हा एकदा प्रेम मिळाले. अधुनाने निकोल सोबत शेअर केलेल्या फोटोवर देखील फरहानने कमेंट केली होती. यावरून हेच दिसते की, दोघांच्याही नात्यातील मैत्री आजही कायम आहे.

ऋतिक रोशन आणि सुजैन खान

ऋतिक रोशन आणि सुजैन खान यांचे नाते नेहमीच चर्चेत राहिले आहे. या दोघांनी वर्ष 2000 मध्ये लग्न केले होते व दोघेही 14 वर्ष एकत्र होते. मात्र नंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर देखील ऋतिक रोशन आणि सुजैन खान यांच्यातील मैत्री कायम आहे. दोघेही आपल्या मुलांबरोबर अनेकवेळा एकत्र दिसतात.

अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया

अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांनी तब्बल 20 वर्ष एकत्र राहिल्यानंतर अखेर वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर दोघांनी त्यांच्या दोन्ही मुलींसाठी नेहमीच एकत्र उभे राहणार असल्याचे म्हटले होते.

मलाइका अरोरा आणि अरबाज खान

मलाइका अरोरा आणि अरबाज खान यांनी 2017 मध्ये एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या दोघांचे लग्न 1998 मध्ये झाले होते. दोघेही 18 वर्ष एकत्र होते.  दोघांना अरहान नावाचा मुलगा देखील आहे.

अनुराग कश्यप आणि कल्कि कोचलिन –

अनुराग कश्यप आणि कल्कि कोचलिनने 2011 मध्ये लग्न केले होते. पाच वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी 2015 मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मात्र वेगळे झाल्यानंतर देखील दोघेही अनेकवेळा एकत्र दिसतात.

कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरी –

रणवीर आणि कोंकणाने 2015 मध्ये घटस्फोट घेतला होता. मात्र मुलगा हारूनसाठी दोघांमधील मैत्री आजही कायम आहे.

आमिर खान आणि रीना दत्ता  –

1986 मध्ये आमिरने रीना दत्ता बरोबर लग्न केले होते. दोघांनीही पळून जाऊन लग्न केले होते. दोघेही 16 वर्ष एकत्र होते. आमिर आणि रीनाला दोन मुले आहेत. आमिरची दुसरी पत्नी किरण राव आणि रीना या दोघीही चांगल्या मैत्रिणी आहेत.

पूजा भट्ट आणि मनीष मखीजा – 

पूजा भट्ट आणि मनीष मखीजा यांनी 2003 साली लग्न केले होते. दोघांनी 11 वर्ष एकत्र राहिल्यानंतर 2014 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला.  मात्र घटस्फोटानंतर देखील दोघेही चांगले मित्र आहेत.

Leave a Comment