सीमेवरील सैनिकांच्या सहवासात विक्की कौशल


या वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपट उरी द सर्जिकल स्ट्राईकचा हिरो विक्की कौशल सध्या भारत चीन सीमेवरील अरुणाचल प्रदेशच्या तवांग मध्ये भारतीय सेना जवानांसोबत काही दिवस राहण्यासाठी गेला आहे. या संदर्भात त्याने ट्विटरवर फोटो शेअर करताना लिहिले आहे, तवांग येथे समुद्रसपाटीपासून १४ हजार फुटांवर आमची भारतीय सेना ताठ उभी आहे. या सैनिकांसोबत काही दिवस घालविण्याची संधी मला मिळाल्याने खूप खुश आहे. जय जवान, जय किसान.

भारताचा स्वातंत्रदिवस १५ ऑगस्ट रोजी साजरा होत आहे या काळात विकी तवांग येथे सैनिकांसोबत राहणार आहे. उरी चित्रपटाचे शुटींग सुरु असतानाच्या काळात अनेकदा तो जवानांसोबत सीमेवर राहिला आहे. ती संधी त्याला पुन्हा एकदा मिळाल्याने विकी खुश आहे. विकी भारताचे पहिले फिल्ड मार्शल जनरल माणेकशा यांच्या बायोपिक मध्ये दिसणार असून हा चित्रपट मेघना गुलजार दिग्दर्शित करणार आहे.

Leave a Comment