भारतवंशी ऑस्ट्रेलियन आमदाराने गीतेवर हात ठेऊन घेतली शपथ


ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरेटरी असेम्ब्ली म्हणजे ऑस्ट्रेलियन विधानसभेत भारतीय वंशाचे दीपक राज यांनी आमदारपदाची शपथ भगवद गीतेवर हात ठेऊन घेतली. ३० वर्षीय दीपक ऑस्ट्रेलियाचे आमदार बनलेले पहिले भारतवंशीय आहेत. १९८९ मध्ये ते ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाले आहेत.

दीपक राज म्हणाले ऑस्ट्रेलियात आमदार गुप्ततेची शपथ बायबलवर हात ठेऊन घेतात. मात्र मी सुरवातीपासून गीतेवर हात ठेऊन शपथ घेण्याचे ठरविले होते आणि गीतेवर हात ठेऊन शपथ घेण्याची माझी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी त्यासाठी बनविलेले नियम तपासून पहिले तेव्हा बायबलवर हात ठेऊन शपथ घेतली पाहिजे असा कोणताही नियम नसल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी मला गीतेवर हात ठेऊन शपथ घेण्याची परवानगी दिली. विधानसभेत गीतेवर हात ठेऊन शपथ घेतल्यावर ती प्रत दीपक यांनी सोवेनियर म्हणून भेट दिली.

दीपक राज ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाल्यावर त्यांना प्रचंड कष्ट करावे लागले होते. कार धुण्यापासून ते रेस्टॉरंटमध्ये काम करण्यापर्यत अनेक कामे त्यांनी केली आणि एकीकडे शिक्षण घेतले. १९९१ मध्ये त्यांना पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून नोकरी मिळाली व त्यानंतर ते डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स मध्ये कार्यकारी अधिकारी बनले. २००६ ते १६ पर्यंत त्यांनी ऑस्ट्रेलिया इंडिया बिझिनेस कौन्सिलचे प्रेसिडेंट म्हणून काम पहिले आहे.

Leave a Comment