अखेर या महिन्यात विवाहबद्ध होणार माजी मिस युनिव्हर्स?


माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने इन्स्टाग्रामवर गतवर्षी नोव्हेंबरमध्ये फोटो पोस्ट करत मॉडेल रोहमन शॉलला डेट करत असल्याचे म्हटले आहे. सुष्मिताच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तेव्हापासून रोहमनसोबतचे बरेच फोटो पाहायला मिळाले. रोहमन सुष्मिताच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होतो. आता हे नाते पुढच्या टप्प्यावर नेण्याचा निर्णय दोघांनीही घेतला आहे. या वर्षाअखेर म्हणजेच नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात सुष्मिता व रोहमन विवाहबद्ध होणार असल्याचे वृत्त आहे.


रोहमन आणि सुष्मिताची प्रेमकहाणी इन्स्टाग्रामवरून सुरू झाली. मला इन्स्टाग्रामवर त्याने डायरेक्ट मेसेज पाठवला होता. पण मी इन्स्टाग्रामवरील मेसेज कधीच वाचत नसल्यामुळे त्या सर्व न वाचलेल्या मेसेजेसमध्ये त्याचासुद्धा एक मेसेज होता. एकदा मुलीसोबत काहीतरी बोलत असताना अचानक डायरेक्ट मेसेजवर क्लिक झाले. मला रोहमनचा मेसेज एवढा आवडला की मी लगेच त्याला रिप्लाय दिल्याचे सुष्मिताने एका मुलाखतीत सांगितले होते. मेसेजचा सिलसिला तेव्हापासूनच सुरू झाला. रोहमनने त्यानंतर सुष्मिताला त्याची फुटबॉल मॅच पाहण्यासाठी बोलावले. त्यांची ही पहिली भेट होती. नंतर सुष्मिताने रोहमनला कॉफीचे आमंत्रण दिले.


सुष्मिता आणि रोहमन यांच्या वयात १५ वर्षांचे अंतर आहे. सुष्मिता यापूर्वी हॉटेल क्षेत्रातील उद्योग सम्राट रितिक भसिनला डेट करत होती, पण सुष्मिता रितिकचे नाते फार काळ टिकू शकले नाही. सुष्मिताचे नाव रितिकसोबतच रणदीप हुडाबरोबर देखील जोडले गेले. पण हे नातेही फार काळ टिकू शकले नाही.

Leave a Comment