सोशल मीडियात का ट्रेंड होत आहे #BoycottUberEats ?


झोमॅटो या ऑनलाईन फूड फ्लॅटफॉर्मवरुन ऑर्डर केलेले जेवण पोहोचवण्यासाठी मुस्लीम तरुण आल्याचे कारण देऊन दिलेली ऑर्डर रद्द करणाऱ्या ग्राहकाला झोमॅटो कंपनीने खडेबोल सुनावले आहेत. त्या पार्श्वभूमीवर झोमॅटोने केलेले ट्विट सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.


झोमॅटोने संबंधित ग्राहकाला अन्नाला कुठलाही धर्म नसतो, याची आठवण करून दिली. उबर इट्सने प्रकारानंतर झोमॅटोला आपला पाठिंबा असल्याचे दर्शवल्यानंतर उबर इट्सलाच नेटकऱ्यांनी धारेवर धरले. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या #BoycottUberEats हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड होत आहे.


मंगळवारी रात्री मध्य प्रदेशातील जबलपूर येथील अमित शुक्ला नावाच्या व्यक्तीने ट्विट करत झोमॅटोकडे मुस्लिम डिलिव्हरी बॉय बदलण्याची मागणी केली. पण, कंपनीने त्यास नकार दिला.


कंपनीने संस्थापक दिपेंदर गोयल यांनीही ठोस भूमिका घेणार ट्विट केले, आम्हाला देशातील विविधतेचा अभिमान आहे. आमचे मूल्यांशी तडजोड करत व्यवसाय करण्याचे धोरण नसल्याचे त्यांनी ट्विटमध्ये लिहिल्यानंतर झोमॅटो आणि गोयल यांच्या या भूमिकांचे ट्विटरवर जोरदार स्वागत करण्यात आले.


अनेकांनी #BoycottUberEats या ट्रेण्डचा धिक्कार केला आहे. योग्य भूमिका झोमॅटोने घेतली असल्याने त्यांना उबर इट्सने पाठिंबा दिला. यात गैर काय असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे.

Leave a Comment