गणिताच्या या प्रश्नाचे उत्तर शोधताना नेटकऱ्यांना सुटला घाम


इंटरनेटवर दररोज अनेक कोडी अथवा प्रश्न व्हायरल होत असतात. या कोड्यांना सोशल मीडियावर देखील लोकांची पसंती मिळत असते. असाच एक गणिताच्या प्रश्नाने सोशल मीडियावर लोक हैराण झाले आहेत. या प्रश्नाच्या उत्तराने लोक दोन गटात विभागली गेली आहेत. सुरूवातीला पाहिल्यावर हा शाळेतील अगदा साधा प्रश्न वाटतो. मात्र याच्या उत्तराने लोकांना हैराण केले आहे. एका युजर्सने सोशल मीडियावर हा प्रश्न विचारला. प्रश्न 8÷2(2+2)=? असा होता. सोशल मीडियावर हा प्रश्न मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आतापर्यंत यावर 12 हजारांपेक्षा अधिक लाईक्स आणि रिट्विट्स आले आहेत.

तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहितीये का ? प्रयत्न करा.

https://twitter.com/jimnlvr/status/1155598358507134976

जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित असेल तर तुमचे उत्तर 16 अथवा 1 असेल. या दोन्ही उत्तरांमुळेच लोकं दोन गटात विभागली गेली आहेत.

https://twitter.com/NomeDaBarbarian/status/1156351630813495296

एका ट्विटर युजर्सने सांगितले की, बोडमास आणि पेमडास या गणित सोडवण्याच्या पध्दतीमुळे उत्तर वेगवेगळे येत आहे. बोडमासद्वारे सोडवले तर उत्तर 16 आहे आणि पेमडास पध्दतीद्वारे सोडवले तर उत्तर 1 आहे. ही दोन्ही उत्तरे बरोबर आहेत. जगातील काही भागात बोडमास पध्दतीने गणित शिकवले जाते तर काही भागात पेमडास पध्दतीने शिकवले जाते.

Leave a Comment