मी मैदान फक्त देशासाठी उतरतो – रोहित शर्मा


मुंबई : गेल्या आठवडाभर सगळ्याच माध्यमांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वादाच्याच चर्चा रंगल्या. पण, या सर्व वृत्ताचे खंडन करताना विराट कोहलीने संघात ऑल इज वेल असल्याचे सांगितले. कोहलीने या अफवा असल्याचे वेस्ट इंडिज दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकारपरिषदेत स्पष्ट केले. आतापर्यंत या सर्व वादावर रोहितने कोणतही वक्तव्य केले नव्हते, पण काल रोहितने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून आपले वैयक्तिक मत व्यक्त केले.


ट्विटवर एक पोस्ट रोहितने शेअर केली आहे. त्याने त्यामध्ये म्हटले की, केवळ संघासाठी नव्हे तर देशासाठी मी मैदानात उतरत असल्याचे त्याने स्पष्ट केले. भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी- 20 मालिकेसाठी अमेरिकेत दाखल झाला आहे. विश्वचषक स्पर्धेनंतरचा भारतीय संघाचा हा पहिलाच दौरा आहे. विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. तसेच विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर रोहितने अनफॉलो केल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या. पण वेस्ट इंडिज दौऱ्याआधी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने सर्व आरोप फेटाळून लावले.

Leave a Comment