सुरक्षित व्यवहार करण्यासाठी ‘गुगल पे’ने आणले खास फिचर


गुगलने गुगल पे हे पेमेंट अॅप वापरणाऱ्या भारतीय युजर्ससाठी खास फिचर आणले आहे. गुगल पे अपडेट केल्यानंतर आता कोणत्याही व्यवहारानंतर युजर्सला नॉटिफिकेशनबरोबरच मेसेज देखील येणार आहे. गुगल पेचे हे फिचर सुरू झाले आहे. आपल्या या नवीन अपडेटची माहिती कंपनीने ब्लॉग पोस्टद्वारे दिली.

गुगल पेचे प्रोडक्ट मॅनेजर अंबरीश केंगे यांनी गुगल पेच्या ब्लॉग पोस्टवर लिहिले की, आम्हाला याविषयी माहिती आहे की, युजर्स गुगल पे वर विश्वास दाखवून त्यांचे पैसे आमच्याकडे देत आहेत. याच विश्वासामुळे आम्ही आमच्या जबाबदारी प्रती जागृक आहोत.

त्यांनी लिहिले की, सुरक्षात्मक सुविधांना लक्षात घेऊन या दिशेने मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. हे नवीन फिचर त्याचाच एक टप्पा आहे.

गुगल पे भारतात 2017 मध्ये तेज नावाने लॉच केले होते. मात्र नंतर कंपनीने याचे नाव बदलले. गुगल पे युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात युपीआयवर काम करते. भारतात सध्या गुगल पेचे लाखो युजर्स आहेत.

Leave a Comment