उन्नाव बलात्कार प्रकरणी ट्विंकलचे ट्विट आणि ट्रोल झाला अक्षय कुमार


बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवर उत्तर प्रदेशातील उन्नाव अत्याचार प्रकरणातील पीडितेला पाठिंबा देण्यासाठी मोहिम चालवली आहे. बॉलीवूडचा खिलाडी कुमार याची पत्नी ट्विंकल खन्नाने देखील यामध्ये पीडितेला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका ट्विटरवर घेतली. पण यावर अक्षय कुमारने मौन बाळगल्याचे दिसत असल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले आहे.


अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाच्या ट्विटनंतर मौन बाळगणे नेटकऱ्यांना खटकले आहे. संवेदनशील विषयावर तो नेहमी आपले मत व्यक्त करीत असतो. अशातच देशभर सध्या उन्नाव पीडितीचे प्रकरण चर्चेचा विषय ठरले असल्यामुळे अक्षय कुमारवर ट्विटर युजर्स तुटून पडले आहेत.


ट्विटरवर ट्विंकलने लिहिले आहे, या मुलीला न्याय मिळेल अशी मी प्रार्थना करते. ही घटना भयावह आहे. ट्रकच्या नंबर प्लेटवर काळे फासणे स्पष्ट करते की, ही घटना अपघात नाही. या ट्विटनंतर अक्षय कुमारवर टीकेची झोड उठली आहे.


अक्षय कुमारने लोकसभा निवडणूकीच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नॉन पॉलिटिकल मुलाखत घेतली होती. आपली प्रतिमा उजळ राखण्याचा तो नेहमी प्रयत्न करीत असतो. अशा पार्श्वभूमीवर त्याच्यावर टीका सुरू झाली आहे.

Leave a Comment