शिबानी पाठोपाठ व्हायरल होत आहेत तिच्या बहिणीचे फोटो


नुकतेच आम्ही अभिनेता दिग्दर्शक फराहन अख्तर आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर यांच्या सुट्टीचे फोटो दाखवले होते. पण आता त्यापाठोपाठ सोशल मीडियात तिची बहिण अनुषा दांडेकरचे फोटो व्हायरल होत आहेत. शिबानीची बहीण अनुषा दांडेकर ही करण कुंद्राला दीर्घकाळापासून डेट करत आहे. दोघांचीही केमिस्ट्री ताज्या फोटोत पाहण्यासारखी आहे. सध्या अनुषा व करण दोघेही व्हॅकेशनवर आहेत. अनुषा व करणला समुद्राकाठी वेळ घालवणे आवडते. दोघांचाही समुद्राकाठी बसून समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकणे हा आवडता छंद आहे. त्यामुळेच व्हॅकेशनच्या फोटोंनी दोघांचेही सोशल अकाऊंट भरलेले आहे.

View this post on Instagram

🧜🏽‍♀️ 🧜🏽‍♂️ 💘

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha) on


छोट्या पडद्यावरचे करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर हे एक क्यूट कपल मानले जाते. खूपच छान अशी या दोघांची केमिस्ट्री आहे. अनुषा आणि करण गेल्या काही वषार्पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचे बॉडिंग, दोघांचे एकमेकांवरचे असलेले प्रेम वेळोवेळी पाहायला मिळते.


करण कुंद्रा अनुषाच्या प्रेमात पडण्याआधी अनेक वर्षे कृतिका कामराच्या प्रेमात होता. त्या दोघांची ओळख ‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेच्या सेटवर झाली होती.


ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. प्रेक्षकांना त्या दोघांची जोडी खूपच आवडत असे. पण ‘कितनी मोहब्बत है’ ही मालिका संपल्यानंतर काहीच महिन्यात त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.


करण कृतिकानंतर अनुषाच्या प्रेमात पडला आहे. अनुषा दांडेकर हिच्याबद्दल सांगायचे झाल्यास ती इंडो-ऑस्ट्रेलियन एमटीव्ही वीजे आहे. सोबत गायिका अशीही तिची ओळख आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये अनुष्काचा जन्म झाला. देल्ही बेली, सिटी ऑफ गोल्ड आणि एंथोनी कौन है सारख्या चित्रपटात तिने अभिनय केला आहे.

Leave a Comment