भाजपची संपत्ती १४८३.३५ कोटींवर


दरवर्षी राष्ट्रीय पक्षांच्या संपत्ती बाबत अहवाल सादर करणाऱ्या असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म म्हणजे एडीआरने यंदाही या संदर्भातला रिपोर्ट सादर केला असून त्यानुसार भारतीय जनता पार्टी देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष बनला आहे. २०१६-१७ आणि २०१७-१८ या काळात देशातील सात राजकीय पक्षांची संपत्ती आणि देणी याची माहिती या अहवालात दिली गेली आहे. विशेष म्हणजे यंदा बहुतेक सर्व पक्षांच्या संपत्तीत वाढ दिसून आली आहे. त्यात भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बहुजन समाज पार्टी, सीपीएम, सीपीआय आणि तृणमूल कॉंग्रेस या पक्षांचा समावेश आहे.

या अहवालानुसार भाजपाच्या संपत्तीत गत वर्षीच्या तुलनेत २२.२७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाजपची संपत्ती १२१३.१३ कोटींवरून १४८३.३५ कोटींवर गेली आहे. त्यामानाने कॉंग्रेस व राष्ट्रवादीची संपत्ती कमी झाली आहे. कॉंग्रेसची संपत्ती गतवर्षी ८५४.७५ कोटी होती ती या वर्षात ७२४.३५ कोटींवर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची संपाती ११.४१ कोटींवरून ९.५४ कोटींवर आली आहे. तृणमूल कॉंग्रेसची संपत्ती २६.२५ कोटींवरून २९.१० कोटींवर गेली आहे.

या अहवालात कॉंग्रेसची देणी सर्वाधिक असून ती रक्कम ३२४.४० कोटी आहे. भाजपला २१.३८ रुपयाचे देणे आहे तर तृणमूलला १०.६५ कोटी देणे द्यायचे आहे.

Leave a Comment