प्लॅटफॉर्म तिकीटाद्वारे रेल्वेचा प्रवास करताना अशी घ्या काळजी


जर तुम्ही विना तिकीट रेल्वेचा प्रवास करत असाल तर हे निश्चितच तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. पकडल्यानंतर तुम्हाला दंड तर बसतोच, मात्र अन्य अडचणींना देखील सामोरे जावे लागते. मात्र अनेकवेळा ट्रेन पकडायची असते आणि तिकीट काढायला तुमच्याकडे वेळच नसतो. अनेकवेळा ट्रेन समोर उभी असते, तिकीट काढण्यासाठी लांबच्या लांब रांग लागलेली असते. अशावेळस एकतर विना तिकीटाचा प्रवास करावा लागतो, अथवा ट्रेन सोडावी लागते. जर दोन्ही गोष्टी तुम्हाला करायचा नसतील, अशावेळेस प्लॅटफॉर्म तिकीट कामाला येते.

तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्म तिकीटाद्वारे देखील प्रवास करू शकता. मात्र यासाठी काही नियम आणि अटी आहे. जर तुम्ही असेच प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन प्रवास करताना सापडला तर दंड आणि शिक्षा देखील होऊ शकते.

प्लेटफॉर्म तिकीट हे 10 रूपयांमध्ये रेल्वे स्टेशनवरच मिळत असते. ज्यामुळे तुम्ही रेल्वे स्टेशनव ये-जा करू शकता. या तिकीटावर एकच व्यक्ती स्टेशनवर जाऊ शकते. हे स्टेशन आयआरसीटीसीच्या साईटवर ऑनलाईन देखील खरेदी केले जाऊ शकते.

अशा प्रकारे करू शकता प्रवास –
तुम्ही जर प्लॅटफॉर्म तिकीटाद्वार प्रवास करत असाल, तर आधी गार्डचे सर्टिफिकेट घेणे गरजेचे आहे. प्लॅटफॉर्म तिकीटाद्वारे गार्डच्या परवानगीचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे, हे सर्टिफिकेट गार्ड, कंडक्टर अथवा त्याच स्तरावरच अधिकारी देऊ शकतो. रेल्वेमध्ये टीटीई आल्यानंतर तुम्ही हे तिकीट दाखवू शकता.

या गोष्टी लक्षात ठेवा –
जर एखादा प्रवासी प्लॅटफॉर्म तिकीटाद्वारे प्रवास करत असेल तर लवकरात लवकर त्याची माहिती टीटीईला देणे गरजेचे असते. सुचना दिल्यानंतर टीटीई त्याला तिकीट प्रदान करेल आणि त्याचबरोबर 250 रूपयांची पेनल्टी देखील द्यावी लागेल. तसेच तिकीटाचे जे पैसे घेतले जातील ते त्याच्या प्रवासाच्या आधारावरच घेतले जातील. रेल्वेमध्ये मिळालेले तिकीट प्रवाश्याला केवळ प्रवास करण्याची परवानगी देते. रिजर्व सीट त्याला मिळत नाही.

ही चुक करू नका –
जाणुनबुजून फ्लॅटफॉर्म तिकीटाचा वापर करून प्रवास करू नका. जर टीटीईने प्रवाशाला प्लॅटफॉर्म तिकीटाबरोबर पकडले व त्यांने त्याचे योग्य तिकीटात रूपांतर केलेले नसेल तर त्याला 1260 रूपयांपर्यंत दंड आणि जेल देखील होऊ शकते.