लवकरच स्वत:चा स्मार्टफोन लाँच करणार टीक-टॉक


मुंबई : आता स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत टीक-टॉक ची पॅरेंट कंपनी ByteDance आहे. आपला स्मार्टफोन लाँच करण्यासाठी ByteDance अनेक काळापासून तयारी करत आहे. हा स्मार्टफोन लाँच झाल्याच्या अफवाही गेल्या काही महिन्यांपासून होत्या. या अफवांवर कंपनीने आता पूर्णविराम लावत फोन लाँच करणार असल्याचे जाहीर केले.

आपला स्मार्टफोन लाँच करण्यासाठी ByteDance ने चीनच्या इलेक्ट्रॉनिक कंपनी स्मार्टिसन टेक्नॉलजीसोबत पार्टनरशिप केली आहे. ByteDance ने या डीलमुळे स्मार्टिसनकडून काही पेटेंट आणि वर्कफोर्सही मिळवला आहे. स्मार्टफोन बनवण्यासाठी या कराराचा फायदा होणार असल्याचा दावा कंपनीने केला.

कंपनीने सध्या या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत अधिक माहिती दिलेली नाही. पण एका चायनीज आउटलेटच्या रिपोर्टनुसार, गेल्या सात महिन्यांपासून या स्मार्टफोनला डेव्हलप केले जात आहे. ByteDance या करारानंतर या स्मार्टफोनमध्ये त्यांचे अॅप्लीकेशन्स देईल. ByteDance ही चीनची एक प्रमुख कंपनी आहे आणि टीक-टॉक व्यतिरिक्त ही कंपनी न्यूज, म्यूजिक स्ट्रीमिंग अॅपसोबतच अनेक अॅप ऑफर करते.