एक किलो चहापावडरसाठी लागली तब्बल 50 हजारांची बोली


आसामची दुर्मिळ मनोहरी गोल्ड चहापावडरवर विक्रमी बोली लागली आहे. गुवाहाटी टी अक्शन सेंटरवर मंगळवारी एक किलो मनोहारी गोल्ड टीची 50 हजार रूपयांमध्ये विक्री झाली आहे. मागील वर्षी याच चहा पावडरची 39 हजार रूपयांमध्ये विक्री झाली होती.

याआधी 2014 मध्ये अरूणाचल प्रदेशच्या डोनी पोलो टी एस्टेटची गोल्डन  नीडव वैरायटी 40000 रूपये प्रती किलो विक्री झाली होती.  गुवाहाटी टी ऑक्शन बायर असोसिएशननेचे सचिव दिनेश बिनानीने दावा केला आहे की, सार्वजनिक लिलावात कोणत्याही चहापावडर साठी लावण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक बोली आहे.

आसामच्या डिब्रूगढमध्ये मनोहरी टी एस्टेटचे मालक राजन लोहिया यांनी सांगितले की, या प्रकारची चहापावडर केवळ 5 किलो बनवण्यात आली होती. हवामानामुळे याची निर्मिती करणे खूप कठीण आहे. या पावडरला पानांपासून नाही तर छोट्या कळ्यांपासून बनवण्यात आले आहे. यावर पावडरवर मागील पाचवर्षांपासून काम सुरू होते. या कळ्यांना विशेष काळजी घेऊन तोडले जाते. या कळ्या खूप नाजूक असतात. जगभरात आसाम, दार्जिलिंग आणि नीलगिरीच्या चहाची सर्वाधिक मागणी असते.

Leave a Comment