660 एकरच्या निर्जन बेटाची 12 करोड रूपयांमध्ये होणार विक्री


स्कॉटलँडमधील एक निर्जन द्विप 12 करोड रूपयांमध्ये विक्रीसाठी तयार आहे. या जागेचे क्षेत्रफळ 660 एकर एवढे आहे. यामध्ये चार बेडरूमचे एक फार्महाऊस आणि एक फेरी बोट आहे. एवढ्या किंमतीत तुम्हाला लंडनमध्ये एक घर मिळू शकते.

या द्विपचे नाव ‘इंचमारनोक’ आहे. येथे एकेकाळी 41 लोक राहत होते. मात्र येथील शेवटचा व्यक्ती देखील 33 वर्षांपुर्वी म्हणजे 1986 मध्ये येथून निघून गेली. 1999 पासून येथील फार्महाऊस आणि द्विप हे एका दांपत्याच्या नावावर आहे. ते जागेचा हॉलिडे होम म्हणून वापर करतात. आता त्यांना हे संपूर्ण द्विप विकायचे आहे.

द्विपला युध्दाचे प्रशिक्षण देण्यासाठी देखील वापर करण्यात येत असे. त्याठिकाणी जमीनीवर बॉम्बमुळे झालेले खड्डे आजही पाहायला मिळतात. येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याला या ठिकाणी ताम्रयुगातील महिलेचे अवशेष देखील सापडले होते. त्यामध्ये ती महिला काळ्या दगडांचा नेकलेस घातला होता. त्या महिलेची ओळख इंचमारनोकची राणी म्हणून झाली होती.

हे द्विप विकण्यासाठी दांपत्यांनी याची जबाबदारी एस्टेट एजेंट स्ट्रट अन्ड पार्कर यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या सेल्स एजेंटनुसार, द्विपवर मोठ्याप्रमाणात शेती केली जाऊ शकते. समुद्र तट देखील जवळच आहे. येण्या-जाण्यासाठी फेरी बोट देखील आहे. याठिकाणी शानदार खेळाचे मैदान देखील तयार केले जाऊ शकते तसेच माश्यांचा व्यवसाय देखील केला जाऊ शकतो. त्यांनी सांगितले की, आम्हाला आशा आहे की, केवळ स्कॉटलँडच नाही तर परदेशातील व्यक्ती देखील द्विप खरेदी करण्यासाठी इच्छुक असतील.

Leave a Comment