एके ४७, बुलेटप्रुफ जॅकेट मध्ये धोनीची गस्त सुरु


विकेटच्या मागे चेंडू झपकण्यासाठी नेहमीच सज्ज असलेला टीम इंडियाचा विकेट कीपर आणि माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी बुधवार पासून नव्या अवतारात दिसणार आहे. धोनी बुलेटप्रुफ जॅकेट, एके ४७ आणि सहा ग्रेनेड सह प्रथमच काश्मीर मध्ये दहशदवाद विरोधी युनिट मध्ये १५ दिवस ड्युटी करत असून तो पॅरा कमांडो बटालियन मध्ये कार्यरत झाला आहे. यंदाचा स्वातंत्रदिवस धोनी येथेच त्याचे कर्तव्य पालन करताना साजरा करणार आहे. धोनी यावेळी १९ किलो वजन वागवत गस्त घालताना दिसेल.

या बटालियन मध्ये देशाच्या विविध भागातील ७०० सैनिक आहेत. त्यात जाट, राजपूत, गोरखा, शीख कमांडो आहेत. धोनी येथे रात्रंदिवस ड्युटी करणार असून अन्य ५० सैनिकांसह बराकीत राहणार आहे. ही बटालियन स्वादिष्ट चिकन करी साठी प्रसिद्ध असून धोनीला आठवड्यातून तीन वेळा या चिकनचा स्वाद चाखता येणार आहे.

२०११ मध्ये टेरेटोरीयल आर्मी मध्ये धोनीला लेफ्ट. कर्नलचे मानद पद दिले गेले आहे. धोनी त्याच्या लष्करी ड्युटीत गार्ड युनिटची रखवाली सुद्धा करणार असून ही चार चार तासांची शिफ्ट आहे आणि दिवसरात्र करावी लागते. दिवसाची ड्युटी पहाटे ४ वा. सुरु होते. याशिवाय धोनीला बंकर माध्येय्ही पापणी न हलविता, कोणतीहि हालचाल न करता येणाऱ्या जाणाऱ्यांवर नजर ठेवायचे कामही करावे लागणार असून ही ड्युटी २-२ तासाची असते. असे लक्ष ठेवणे हे फार महत्वाचे काम मानले जाते.

Leave a Comment