पिरामल इंडस्ट्रीजला ४६१ कोटींचा नफा


पिरामल इंडस्ट्रीजने पहिल्या तिमाहीत ४६१ कोटींचा नफा मिळविला असून तो गतवर्षीपेक्षा २१ टक्के अधिक आहे. गतवर्षी याच काळात कंपनीने ३८२ कोटी नफा मिळविला होता. कंपनीच्या महसुलात एकूण २१ टक्के वाढ होऊन तो ३३०५ कोटींवर पोहोचला असल्याचे कंपनीचे अध्यक्ष अजय पिरामल यांनी सांगितले.

ते म्हणाले, गेल्या वर्षी कंपनीने २९०२ कोटींचा महसूल मिळविला होता. यंदा एनबीएफसी मध्ये रोकड अडचणी व पूर्ण उद्योग क्षेत्रात मंदी असूनही कंपनीने कमाई व नफा दोन्हीतही १६ व्या तिमाहीत वाढ नोंदविली आहे. गेला काही काळ कंपनी सातत्याने वित्त सेवा क्षेत्राला मजबुती देण्यासाठी काम करत आहे. यंदा सेवाक्षेत्रात ८ ते १० हजार कोटी इक्विटी गुंतवणूक करण्याची योजना आखली जात आहे.

अजय यांचे पुत्र आणि पिरामल इंडस्ट्रीजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आनंद पिरामल हे देशातील बडे उद्योजक मुकेश अंबानी यांचे जावई असून अंबानी यांची कन्या इशा हिचे पती आहेत.

Leave a Comment